Dharmaveer 2 OTT: 'धर्मवीर २'चा ओटीटीवर बोलबाला, पहिल्याच आठवड्यात 'इतके' व्ह्यूज!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dharmaveer 2 OTT: 'धर्मवीर २'चा ओटीटीवर बोलबाला, पहिल्याच आठवड्यात 'इतके' व्ह्यूज!

Dharmaveer 2 OTT: 'धर्मवीर २'चा ओटीटीवर बोलबाला, पहिल्याच आठवड्यात 'इतके' व्ह्यूज!

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 05, 2024 01:27 PM IST

Dharmaveer 2 OTT: ‘धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. ओटीटीवरही चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.

Dharmaveer 2 Teaser Out
Dharmaveer 2 Teaser Out

गेल्या काही दिवसांपासून ‘धर्मवीर’ आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणार ‘धर्मवीर २’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर निर्मात्यांनी ‘धर्मवीर २’ची घोषणा केली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शित झालेले टीझर आणि पोस्टर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे ठरले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता ओटीटीवरही या चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

ओटीटी गाजवले सिनेमाने

साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगत बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या 'धर्मवीर २' या चित्रपटानं मोठा मान मिळवला आहे. झी5 या ओटीटीवर एका आठवड्यात सर्वाधिक व्ह्यूज 'धर्मवीर २' या चित्रपटानं मिळवले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसपाठोपाठ ओटीटीवरही साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट गाजत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'धर्मवीर २' या चित्रपटाला एकाच आठवड्यात ५० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी वाळवी या चित्रपटाला एका आठवड्यात १४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. त्यामुळे 'धर्मवीर २' चित्रपटाने वाळवी चित्रपटाला मागे टाकून नवा विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता ओटीटीवरही जगभरातील प्रेक्षकांनी 'धर्मवीर २' या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
वाचा: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम

काय आहे चित्रपटाची कथा?

‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे २०२२ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले होते ते दाखवण्यात आले आहे. या सिनेमात राजकीय निष्ठा आणि महत्त्वाकांक्षेची आव्हाने तसेच दिघे यांचे वारसदार या नात्याने शिंदे यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. सोबतच राजकीय पटलावरीर आव्हानांतून मार्ग काढताना आलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. महेश लिमये यांची देखणी सिनेमेटोग्राफी आणि श्रवणीय संगीतामुळे हा सिक्वेल आजच्या प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी आणि आनंद दिघे यांच्या वारशाचा सन्मान करणारी गोष्ट दाखवणारा आहे.

प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन आणि झी स्टुडिओ निर्मित ‘धर्मवीर २ मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. क्षितिश दातेने चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकरली आहे. तर प्रसाद ओक आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आनंदी झाले आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला नाही आता त्यांना पाहण्याची संधी मिळाली आहे.

Whats_app_banner