काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. कारण रोहित चौहान हे पात्र ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात काही रहस्यमय घटना घडताना दिसणार आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. त्यामुळ रोहित चौहनचे रहस्य उलगडणार आहे.
‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. आता चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरवर चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देण्यात आली आहे. १८ ऑक्टोबरला हा रोहित चौहान नेमका कोण आहे याचे रहस्य समोर येणार आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत. पोस्टरवर सेल्फीत दिसणारे चेहरे आणि मागे दिसणाऱ्या चेहऱ्यांवरील हावभाव खूप वेगळे आहेत. या चेहऱ्यांमध्ये काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्या ने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून 'लाईक आणि सबस्क्राईब' चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आ हे.
वाचा : अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
दिग्दर्शक अभिषेक मेरूकरने चित्रपटाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. "लाईक आणि सबस्क्राईब हा दैनंदिन शब्द झाला आहे. रोजच्या जीवनात हा शब्द सर्रास ऐकला जातो आणि याच शब्दां भोवती फिरणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे . हा एक रहस्यमय चित्रपट असून प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवेल. येत्या १८ ॲाक्टोबरला रोहित चौहान कोण आहे ? याचा उलगडा होईल " असे म्हटले आहे.