सध्या संपूर्ण देशात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंतच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी हा राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी अनंत आणि राधिकाच्या लग्न पुत्रिकेची चर्चा रंगली होती. ही लग्न पत्रिका खास असल्याचे समोर आले होते. या लग्नाचे आमंत्रण कोणाला आले कोणाला नाही विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीला लग्नाचे आमत्रंण आले आहे.
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अंबानी यांच्या लग्न सराईची. अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकरला अंबानी कुटुंबाकडून या लग्नसोहळ्याचं विशेष निमंत्रण देखील आल्याचे कळत आहे. बॉलिवुड पासून हॉलिवूड पर्यंत अनेक कलाकार या लग्न सोहळ्यात येणार असल्याचा बातम्या असताना आता आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला देखील या लग्न सोहळ्याचे खास निमंत्रण आले आहे.
वाचा: कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?
अमृताने अंबानी कुटुंबीयांनी पाठवलेल्या लग्न पुत्रिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती लग्न पत्रिकेचा बॉक्स उघडताना दिसत आहे. या बॉक्सवर अमृताचे नाव लिहिण्यात आले आहे. तिने या बॉक्समध्ये काय आहे हे देखील दाखवले आहे.
वाचा: सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट
लग्नाच्या पत्रिकेसाठी एक बॉक्स तयार करण्यात आला आहे. हा बॉक्स उघडल्यावर त्यामध्ये चांदीचे मंदीर दिसत आहे. या मंदिरामध्ये काही देवतांच्या सोन्याचे पाणी मारलेल्या मूर्ती दिसत आहेत. तसेच त्यासोबत देण्यात आलेल्या पत्रिकमेमध्ये फ्रेम्स आहेत. या फ्रेम्समध्ये श्री गणेश, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी, राधा-कृष्ण, देवी दुर्गा अशा काही देवतांचे फोटो लावण्यात आले आहेत. एका बॉक्समधील डिझायनर कपड्यावर ‘अ’ आणि ‘र’ म्हणजेच अनंत आणि राधिका ही सुरुवातीची अक्षरे लिहिण्यात आली आहेत. त्यानंतर एका फ्रेममध्ये लग्नाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
वाचा: फास घेण्याची धमकी देत मराठी निर्माता शिवाजी पार्कात चढला झाडावर, काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी १९ जानेवारीला अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा पार पडला. त्यानंतर आता मार्च महिन्यात प्रीवेडींग सोहळा पार पडला. त्यापाठोपाठ ईटलीमध्ये दुसरा प्रीवेडींग सोहळा पार पडला. आता १२ जुलै रोजी मुंबईत मोठ्या धुमधडाक्यात लग्न पार पडणार आहे. नीता अंबानी यांनी अनंतच्या लग्नाची संपूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे हा शाही लग्नसोहळा पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
संबंधित बातम्या