Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर दोन महिन्यांपासून आजारी! पोस्ट शेअर करून म्हणाली...-amruta khanvilkar illness amruta khanvilkar battling with dengue and bronchitis share post ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर दोन महिन्यांपासून आजारी! पोस्ट शेअर करून म्हणाली...

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर दोन महिन्यांपासून आजारी! पोस्ट शेअर करून म्हणाली...

Jan 01, 2024 04:07 PM IST

AmrutaKhanvilkar illness:गेल्या दोन महिन्यांपासून अभिनेत्री अमृता एका आजाराचा सामना करत आहे. याबाबत आता तिने स्वतःच खुलासा केला आहे.

Amruta Khanvilkar illness
Amruta Khanvilkar illness

Amruta Khanvilkar illness: आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सगळ्यांनाच वेद लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नववर्षाच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या जुन्या आठवणींनाउजाळा दिला होता.२०२३ हे वर्ष आपल्यासाठी कसं होतं, या वर्षात काय घडून गेलं याचा आढावा कलाकारांनी घेतला होता. याच दरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने आपण दोन महिने आजारी होतो, याचा देखील खुलासा केला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून अभिनेत्री अमृता एका आजाराचा सामना करत आहे. याबाबत आता तिने स्वतःच खुलासा केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अमृताने तिचा एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने तिच्या आजारापणाबाबत मोकळेपणाने सांगितले आहे. आता तिची तब्येत सुधारू लागली आहे. पण, गेल्या दोन महिन्यांच्या या आजारपणात अमृताला अनेक कठीण गोष्टींचा सामना करावा लागला आहे. आपण आता यातून बरे होत आहोत, असं देखील अमृता खानविलकर हिने म्हटले आहे.

Rakulpreet Singh Wedding: नव्या वर्षात रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात! ‘या’ दिवशी घेणार सात फेरे­

या पोस्टमध्येअमृता म्हणाली की, तीगेल्या दोन महिन्यांमध्ये डेंग्यु वब्रोंकायटीसया आजाराचा सामना करत होती. या दरम्यानच्या काळातला प्रत्येक क्षण तिच्यासाठी थकवणारा होता. अमृता म्हणाली, यावेळी मला असं वाटलं की, मी कोणत्या तरी नव्या संकटामध्ये अडकले आहे. पण, याच काळामध्ये माझा धीर अधिक वाढला. मला असं वाटतं की, तुम्ही जसे आहात तसेच राहा. इतर लोक तुमचं अनुकरण स्वतःहूनच करतील. जर, तुम्ही कष्ट करत आहात, तर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल.’

अमृता खानविलकरने तिच्या आजाराविषयी सांगितल्यानंतर सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अमृताच्या या पोस्टनंतर ती आता या आजारामधून बरी होत असल्याचे चाहत्यांना कळले आहे. अभिनय आणि नृत्य याशिवाय ती अनेक ठिकाणी भटकंती करत असते. यादरम्यानचे, तिचे बरेच व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. आता नव्या वर्षात देखील ती चाहत्यांना खास सरप्राईज देणार आहे.

विभाग