मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Fadnavis: देवेंद्रजींचं नाव घेऊन अमृता फडणवीसांनी घेतला उखाणा, लोक म्हणतात हा तर टोमणा!

Amruta Fadnavis: देवेंद्रजींचं नाव घेऊन अमृता फडणवीसांनी घेतला उखाणा, लोक म्हणतात हा तर टोमणा!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 06, 2024 12:46 PM IST

Amruta Fadnavis Ukhana: नागपूरमधील ‘विकासाचे वाण हळदी कुंकू’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी खास उखाणा घेतला.

Amruta Fadnavis Ukhana
Amruta Fadnavis Ukhana (@AmrutaF_fans)

Amruta Fadnavis Ukhana: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता फडणवीस यांनी कलाक्षेत्रात आपलं एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर त्यांची गाणी बरीच चर्चेत असतात. अमृता फडणवीस या राजकारणात थेट सक्रिय नाहीत. मात्र, त्या नेहमी पती देवेंद्र फडणवीस यांची साथ देत, त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहताना दिसतात. अमृता फडणवीस अनेकदा विरोधकांवर थेट टीका करतानाही दिसतात. मात्र, यावेळी त्यांनी खास उखाणा घेत विरोधकांवर टीका केली आहे. त्यांचा हा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अमृता फडणवीस अनेक कार्यक्रमात अगदी हिरहिरीने सहभागी होतात. नुकताच नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी खास हळदी-कुंकू आयोजित करण्यात आले होते. ‘विकासाचे वाण हळदी कुंकू’ या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला उपस्थित महिलांसोबत हळदी कुंकवाचं वाण लुटून, त्यांनी सगळ्यांसोबत संवाद देखील साधला. यावेळी सगळ्या महिलांनी अमृता फडणवीस यांना उखाणा घेण्याचा आग्रह केला. तर, सगळ्यांच्या आग्रहाचा मान ठेवून अमृता फडणवीस यांनी एक खास उखाणा घेतला. या उखाण्यातून त्यांनी विरोधकांना टोमणा मारण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

Tharala Tar Mag 5th Feb: दारू पिऊन सायली करणार माथेरानमध्ये तमाशा? प्रियाचा डाव सफल होणार?

अमृता फडणवीस यांचा उखाणा ऐकलात का?

नागपूरमधील ‘विकासाचे वाण हळदी कुंकू’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी खास उखाणा घेतला. ‘देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण’ असा खास उखाणा अमृता फडणवीस यांनी घेतला. अमृता फडणवीस यांचा हा उखाणा ऐकून उपस्थित सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. एकाच उखाण्यातून त्यांनी आपल्या पतीची शान मिरवली तर, विरोधकांना देखील जोरदार टोला हाणला. त्यांचा हा उखाणा ऐकून सगळ्यांनीच त्यांचं भरपूर कौतुक केलं. यावेळी अमृता फडणवीस यांनी एक गाणं देखील गायलं.

सोशल मीडियावर त्यांनी घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी देखील कमेंट करत आहेत. अमृता फडणवीस यांनी घेतलेला हा उखाणा म्हणजे विरोधकांना टोमणाच आहे, अश प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. तर, काहींनी त्यांच्या या उखाण्याचे कौतुक देखील केले आहे. अमृता फडणवीस यांनी गायन क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी गायलेली गाणी सोशल मीडियावर पसंत केली जातात. नुकतंच त्यांचं राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आलेलं ‘राम नाम’ हे भजन प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं.

WhatsApp channel

विभाग