मनोरंजन विश्वात पार्ट्या करणे ही अतिशय कॉमन गोष्ट आहे. अनेक कलाकार हे वेगवेगळे निमित्त साधून पार्ट्यांचे आयोजन करत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता पार्टीमध्ये बेधुंद होऊन नाचत होता. तेवढ्यात अचानक, न सांगता त्याची पत्नी तेथे पोहोचली आहे. आता हा अभिनेता कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया या अभिनेत्याविषयी...
सोशल मीडियावर सध्या मराठमोळा अभिनेता प्रसाद जावदे चर्चेत आहे. नुकत्याच ‘झी मराठी’ वाहिनीच्या नॉमिनेशन पार्टीला प्रसादने हजेरी लावली होती. सर्व ‘झी मराठी’चे कलाकार या पार्टीला हजर होते. यावेळी प्रसादही इतर कलाकारांसह थिरकताना दिसला. तो बेधुंद होऊन सहकलाकारांसोबत नाचत होता. नेमकं त्याचवेळी प्रसादची पत्नी अमृता त्याला सरप्राईज देण्यासाठी तेथे पोहोचली. प्रसाद नेमकं काय करतो हे रंगेहात पकडण्यासाठी ती या पार्टीत पोहोचली असल्याचं तिने गमतीत म्हटलं आहे. अभिनेत्रीने या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसादचा पार्टीमधील व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, “जेव्हा तुम्हाला त्याला रंगेहात पकडायचं असतं, पण तो सर्वांत वेगळा आहे” असे कॅप्शन दिले आहे. अमृताला पाहून प्रसाद धावत तिच्याकडे पळत जातो. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी या पोस्टवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमृता व प्रसाद नेहमीच एकमेकांची पोलखोल करत व्हिडीओ शेअर करत असतात.
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
प्रसादने अभिनेत्री अमृता देशमुखशी लग्न केले आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे ही जोडी एकत्र आलेली पाहायला मिळाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीचे नाते होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. थेट साखरपुडा करत त्यांनी सर्वांना धक्का दिला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात त्यांनी लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर प्रसाद व अमृता दोघेही कामाला लागले आहेत. प्रसाद सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारु’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तर अमृता ही तिच्या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. सध्या सोशल मीडियावर अमृताने शेअर केलेला व्हिडीओ तुफान चर्चेत आहे.