Saif Ali Khan: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Saif Ali Khan: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?

Saif Ali Khan: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 16, 2025 05:05 PM IST

Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. दरम्यान, एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अमृता सिंगने सैफला झोपेच्या गोळ्या दिल्या. आता त्यामागचे कारण काय होते चला जाणून घेऊया...

Happy Birthday Amrita Singh
Happy Birthday Amrita Singh

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने करीना कपूशी लग्न करण्यापूर्वी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. त्यांचा संसार जवळपास १३ वर्षे टिकला. २००४ मध्ये सैफ आणि अमृता यांचा अखेर घटस्फोट झाला. दरम्यान, चित्रपट निर्माते सूरज बडजात्या यांनी एकदा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या जोडप्याबद्दलचा एक किस्सा उघड केला. एकेकाळी अमृता सिंग ही सतत सैफला झोपेच्या गोळ्या द्यायची. आता त्यामागे नेमके काय कारण होते? चला जाणून घेऊया...

'हम साथ साथ है' या चित्रपटात सैफसोबत करिश्मा कपूर, सलमान खान, सोनाली बेंद्रे, मोहनीश बहल आणि तब्बू यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. एका मुलाखतीत, सूरज बडजात्या यांनी 'हम साथ साथ है'च्या सेटवर घडलेली घटना सांगितली. निर्मात्यांना हवा असलेला शॉट देण्यासाठी सैफ अली खान तयार नव्हता. त्याने किती वेळा प्रयत्न करून ही हवा असलेला शॉट शूट होत नव्हता. सारखे रिटेक द्यावे लागत होते. कारण, सैफला रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप लागत नसे.

दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

बडजात्या म्हणाले, "'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सैफ अली खानच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ-उतार आले. त्यामुळे तो नेहमीच तणावात असायचा. चित्रपटातील 'सुनो जी दुल्हन' या गाण्याच्या वेळेबद्दल एक किस्सा आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान सैफ अली खान अनेक रिटेक घेत होता. तो रात्रभर झोपत नव्हता, तो या पात्राला चांगल्या पद्धतीने कसे साकारायचे याचा विचार करत होता. त्याच्या पहिल्या पत्नीशी बोलल्यावर मला हे कळले."

सैफला देण्यात आल्या झोपेच्या गोळ्या

सैफ अली खानला झोपेच्या गोळ्या देण्याची कल्पना सूरज बडजात्याची होती. त्याने अमृता सिंगला हा सल्ला दिला. "तो रात्रभर झोपत नव्हता, म्हणून मी अमृताला एक सल्ला दिला. सैफच्या नकळत अमृताला झोपेच्या गोळ्या देण्याचा सल्ला देण्यात आला. तिने त्याला नकळत झोपेच्या गोळ्या दिल्या. दुसऱ्या दिवशी त्याचे बरेच सीन ठेवण्यात आले. त्याने ते केले. सैफने गाण्याने एकाच टेकमध्ये खूप चांगला शॉट दिला. त्याने खूप चांगला शॉट दिल्याने सगळेच थक्क झाले," दिग्दर्शक म्हणाला.
वाचा: चिप्सच्या दुकानात बसून घेतले अभिनयाचे धडे, अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी वाचून डोळ्यात येईल पाणी

सिनेमाविषयी

हम साथ साथ है बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित चित्रपट म्हणून आज त्याकडे पाहिले जाते. २००४ मध्ये अमृता सिंगशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने २०१२ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानशी लग्न केले. या जोडप्याला तैमूर आणि जहांगीर ही दोन मुले झाली.

Whats_app_banner