Amol Kolhe: अमृता खानविलकरबरोबर लग्न करणार?; ‘त्या’ वृत्तावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amol Kolhe: अमृता खानविलकरबरोबर लग्न करणार?; ‘त्या’ वृत्तावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

Amol Kolhe: अमृता खानविलकरबरोबर लग्न करणार?; ‘त्या’ वृत्तावर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Apr 02, 2023 12:18 PM IST

Amol Kolhe on marriage with Amruta Khanvilkar : अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीमधील बातमी शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Amol Kolhe
Amol Kolhe

Amol Kolhe on marriage with Amruta Khanvilkar : खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी राजकीय भूमिकांमुळे ते चर्चेचा विषय ठरतात. अमोल कोल्ह सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाचे महाराष्ट्रात अनेक प्रयोग करताना दिसत आहेत. दरम्यान, त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये "अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?" असे म्हटले गेले आहे.

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. नुकताच त्यांनी एका वृत्तवाहिनीमधील बातमीचा फोटो शेअर केला आहे. या बातमीची हेडलाइन "अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात?" असे कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच संपूर्ण बातमी ही अमृता आणि अमोल यांच्या लग्नाविषयी लिहिण्यात आली आहे.
वाचा: आसामचा नयनज्योती सैकिया बनला 'मास्टरशेफ'! जिंकली एवढी प्राइज मनी

अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर ही बातमी शेअर करताना “हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!” असे कॅप्शन दिले आहे.

काय आहे पोस्ट?

अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या एका वृत्तवाहिनीच्या बातमीमध्ये, "डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेत्री अमृता खानविलकरच्या प्रेमात पडले आहेत आणि लवकरच ते तिच्याशी लग्न करणार आहेत. इतकंच नव्हे तर अमृता हे नाव त्यांच्यासाठी लकी आहे आणि तिच्यासोबत लग्न केल्यामुळे ते उपमुख्यमंत्री होऊ शकतील" असे स्वत: अमोल कोल्हे बोलले असल्याचे सांगण्यात आले आहे.

Whats_app_banner