Guess movie: बजेट ९० लाख पण कमावले १८ कोटी रुपये, ओळखा पाहू अमिताभ बच्चन यांचा 'तो' सिनेमा?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Guess movie: बजेट ९० लाख पण कमावले १८ कोटी रुपये, ओळखा पाहू अमिताभ बच्चन यांचा 'तो' सिनेमा?

Guess movie: बजेट ९० लाख पण कमावले १८ कोटी रुपये, ओळखा पाहू अमिताभ बच्चन यांचा 'तो' सिनेमा?

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 07, 2024 05:03 PM IST

Guess movie: आज आम्ही तुम्हाला अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाविषयी सांगत आहोत जो कमी बजेटमध्ये बनला होता, पण बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जया बच्चन झळकल्या होत्या.

Guess the movie
Guess the movie

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये अँग्री यंग मॅन म्हणून ओळखलं जातं. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी असे काही सिनेमे केले आहेत ज्यात त्यांची अँग्री यंग मॅनची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांना विशेष भावल्या. आज आपण बोलत आहोत अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाबद्दल जो कमी बजेटमध्ये बनला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत जया बच्चन झळकल्या होत्या. हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला होता.

अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ओळखलात का?

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचं नाव तुम्हाला आठवलं का? नसेल तर चला जाणून घेऊया... या चित्रपटाचे नाव जंजीर असे आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका पोलिसाच्या भूमिकेत दिसले होते. अमिताभ आणि जया यांच्याव्यतिरिक्त प्राण, ओमप्रकाश, योगराज सिंह आणि नंदिता ठाकूर हे कलाकार या चित्रपटात दिसले होते.

९० लाख रुपयांचे बजेट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट ९० लाखांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने त्या काळात जगभरात १७.४६ कोटींची कमाई केली होती.

चित्रपटाचा रिमेकही आला होता

दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचा रिमेकही बनवण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाचा रिमेक बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला होता. या रिमेकमध्ये प्रियांका चोप्रा, राम चरण, संजय दत्त, प्रकाश राज आणि माही गिल सारखे कलाकार होते.
वाचा: Pushpa 2 The Rule review: 'पुप्षा २' पाहायला जाताय? थांबा! आधी हे वाचा आणि मग निर्णय घ्या

चित्रपटाचे कथानक काय होते?

चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन हे एक पोलीस आहेत ज्यांना त्यांच्या पदावरून निलंबित केले जाते. यानंतर ते आपल्या आई-वडिलांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी निघाले आहेत. अमिताभ यांच्या या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.५ आहे. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.

 

Whats_app_banner