बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. बिग बीं प्रमाणे त्यांचे कुटुंबीय देखील चर्चेत असतात. सध्या एका वेगळ्या कारणामुळे बच्चन कुटुंबीय चर्चेत आहे. अमिताभ यांनी ऐश्वर्याला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. त्यामागे काय कारण असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मनोरंजनसृष्टीत बच्चन कुटुंबीय कायमच चर्चेत असतात. मध्यंतरी ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, ‘द आर्चीस’च्या प्रीमियरला ऐश्वर्या-अभिषेकने एकत्र हजेरी लावली होती. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम लागला. आता अमिताभ बच्चन यांनी सूनबाई ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
वाचा: आर्चीची टोळी वाचवू शकेल 'ग्रीन पार्क'? कसा आहे स्टार किड्सचा 'द आर्चिज' सिनेमा?
अमिताभ यांचे इन्स्टाग्रामवर जवळपास ३६ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामध्ये ते केवळ ७४ लोकांना फॉलो करतात. या यादीमध्ये त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत काही बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. यामध्ये ऐश्वर्याचे नाव सध्या दिसत नाही. अमिताभ बच्चन यांनी सुनेला अनफॉलो केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय ऐश्वर्याला वाढदिवसानिमित्त फक्त अभिषेकने शुभेच्छा दिल्या होत्या. नवऱ्या व्यतिरिक्त तिच्यासाठी सोशल मीडियावर कोणीही पोस्ट शेअर केली नव्हती.
एकीकडे बच्चन कुटुंबीयांमध्ये काही तरी वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे बिग बी याआधी सुद्धा ऐश्वर्याला फॉलो करत नव्हते असा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी मुलगी श्वेता बच्चनच्या नावावर जुहूमधील एक बंगला केला. तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आले होते.
संबंधित बातम्या