Shole: 'शोले'मधील तो सीन शूट करायला लागले तीन वर्षे, वाचा रंजक किस्सा-amitabh bachchan talked about shole movie scene ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shole: 'शोले'मधील तो सीन शूट करायला लागले तीन वर्षे, वाचा रंजक किस्सा

Shole: 'शोले'मधील तो सीन शूट करायला लागले तीन वर्षे, वाचा रंजक किस्सा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 23, 2024 08:05 AM IST

Shole: शोले चित्रपटाच्या सीनबद्दल तुम्हाला माहिती आहे का, ज्याच्या शूटिंगसाठी टीमला ३ वर्षे लागली होती. महानायक अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला होता.

Sholay Movie Scene
Sholay Movie Scene

रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात दोन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. हे दोन मित्र एका गावार होणाऱ्या दरोडेखोरांपासून गावकऱ्यांची रक्षा करत असतात. या गावातील ठाकूर या दरोडेखोरांना कंटाळलेला असतो म्हणून तो जय-वीरुला बोलावतो. पण तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटातील एक सीन शूट करायला तीन वर्षे लागली.

बिग बींनी सांगितला शुटिंगच्या वेळचा किस्सा

'शोले' चित्रपटातील एक सीन तुम्हाला आठवत असेल ज्यात जया बच्चन पहिल्या मजल्यावर जाऊन दिवा लावतात आणि बच्चन साहेब समोरच्या घराच्या तळमजल्यावर बसलेले असतात. हा एक सीन शूट करण्यासाठी रमेश सिप्पी यांना तीन वर्षे लागली हे फार कमी लोकांना माहित आहे. कारण या सीनसाठी त्यांना एका खास प्रकारच्या लाईटची गरज होती. खुद्द अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात बोलताना हा किस्सा सर्वांना सांगितला.

एका सीनसाठी लागले ३ वर्ष

'शोले' चित्रपटातील एक सीन आठवला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यात जया बच्चन एका घराच्या कॉरिडॉरमध्ये पहिल्या मजल्यावर दिवा लावतात. हा सीन शूट करण्यासाठी एका खास प्रकारच्या लाईटची गरज होती. आमच्या डीओपीला (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) सूर्य मावळत असतानाच तो सीन शूट करायचा होता. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण रमेश यांनी हा सीन शूट करायला तीन वर्षे लावली' असे अमिताभ म्हणाले.
वाचा: 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर रीम शेखनंतर राहुल वैद्यचा अपघात, चेहऱ्यावर आली आग

Sholay Movie Scene
Sholay Movie Scene

छोलेची एकूण कमाई किती झाली होती?

"जेव्हा जेव्हा आम्ही त्या सीनसाठी अभिनय करायला गेलो तेव्हा लाइटिंगमध्ये काहीतरी गडबड होती. त्यामुळे रमेश सिप्पी आम्हाला म्हणाले की जोपर्यंत योग्य प्रकाश मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा सीन शूट करणार नाही. तब्बल ३ वर्षे आम्ही अशा प्रकाशाची वाट पाहिली. ज्यानंतर आम्हाला तो शॉट मिळाला" हे ऐकून सर्वजण चकीत झाले. अवघे ३ कोटी रुपये खर्चकरून बनलेल्या 'शोले' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आजही प्रेक्षक शोले हा चित्रपट फार आवडीने पाहातात

Whats_app_banner