बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त होता. त्याचबरोबर चित्रपटाच्या कथेला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले आहे. 'आय वॉन्ट टू टॉक' पाहिल्यानंतर अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना कसा वाटला चित्रपट चला जाणून घेऊया...
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे जी चर्चेत आहे. खरं तर बिग बींनी मुलगा अभिषेक बच्चनची 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटासाठी एक फॅन पोस्ट रिपोस्ट केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी, 'या अभिनयासाठी एकच शब्द आहे. जादू, माझे प्रेम आशीर्वाद आणि बरेच काही. माझा मुलगा आहे त्यामुळे तो माझा वारसदार होणार नाही. जे माझे उत्तराधिकारी असतील ते माझे पुत्र होतील! अभिषेक, माझा मुलगा, माझा उत्तराधिकारी' असे म्हटले आहे. या पोस्टच्या माध्यमातून बिग बींनी आपल्या मुलाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. यापूर्वी दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी अभिषेकचा आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचे म्हटले होते.
अमिताभ बच्चन आपल्या कामासोबतच सोशल मीडियावर ही खूप अॅक्टिव्ह असतात. बिग बींच्या दिवसाची सुरुवात सोशल मीडियावरील एका पोस्टने होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ते अनेकदा अनेकदा दररोज सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांशी जोडलेला असतो. चाहतेही बिग बींच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.
वाचा: ए. आर. रेहमान गिटारवादक मोहिनीला करतोय डेट? दोघांनीही एकाच वेळी घटस्फोटाची घोषणा केल्याने चर्चांना उधाण
'आय वॉन्ट टु टॉक' या चित्रपटात अभिषेक हा अर्जुनच्या भूमिकेत दिसत आहे. या अर्जुनला बोलायला फार आवडते. त्याला एक आजार झाला आहे. या आजारामध्ये त्याचा आवाज गेला आहे. ट्रेलरमध्ये या अर्जुनच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच तो ट्रेलरमध्ये माफी मागताना देखील दिसत आहे. पण अभिषेक नेमकी माफी का मागत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता त्या मागचे रहस्य चित्रपट पाहिल्यावर समोर येणार आहे.