बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्रोल्सला ट्रोल केले आहे. अभिषेक बच्चनच्या आगामी कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल ५'चा ट्रेलर आल्यापासून त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ शेअर करून त्याचे कौतुक करत आहेत. अशातच अमिताभ बच्चन यांनी आपला मुलगा अभिषेक बच्चनच्या एका चाहत्याची पोस्ट पुन्हा पोस्ट केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले की, 'या सुंदर व्यक्तीसाठी खूप प्रार्थना आणि प्रेम. दुसरी पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं, 'भइयू…दुआएं।. अमिताभ बच्चन यांचा हा ट्रेंड पाहून काही लोकांनी हे सर्व अभिषेक बच्चन यांची पीआर टीम करत असल्याचं म्हटलं आहे. एकाने लिहिले, 'पीआर मजबूत आहे. मुलाची पीआर टीम अभिषेकचं कौतुक करत आहे आणि मग मुलगा वडिलांच्या फोनवरून स्वत:चं कौतुक करत आहे.
अशा तऱ्हेने अमिताभ बच्चन यांनी या ट्रोलर्सना उत्तर देताना लिहिलं, 'आहाहा! न मागताच PR झाला!!'
'हाऊसफुल ५' हा चित्रपट ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी 'हाऊसफुल ५'मध्ये प्रचंड स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, संजय दत्त, डिनो मोरिया, श्रेयस तळपदे, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
संबंधित बातम्या