मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी भाड्यानं दिलं नवं ऑफिस; महिन्याचं भाडं ऐकून बसेल धक्का!

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी भाड्यानं दिलं नवं ऑफिस; महिन्याचं भाडं ऐकून बसेल धक्का!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 30, 2023 09:43 AM IST

Amitabh Bachchan Rented his Commercial Property:अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील आलिशान इमारतीत खरेदी केलेलं ऑफिस आता भाड्याने दिलं आहे.

Amitabh Bachchan Rented his Commercial Property
Amitabh Bachchan Rented his Commercial Property

Amitabh Bachchan Rented his Commercial Property: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील आलिशान इमारतीत खरेदी केलेलं ऑफिस आता भाड्याने दिलं आहे. ओशिवरामधील या कमर्शिअल टॉवरमध्ये अमित बच्चन यांनी चार ऑफिस युनिट्स खरेदी केले होते, जे आता वॉर्नर म्युझिक इंडिया या संगीत कंपनीला पाच वर्षांसाठी भाड्याने देण्यात आले आहेत. वॉर्नर म्युझिक इंडियाला भाडेपट्टीच्या कालावधीत एकूण ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त भाडे द्यावे लागणार आहे. मार्च २०२४पासून हा भाडे करार सुरू होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी १२००० स्क्वेअर फूट आणि १०८०० स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेले चार ऑफिस अंदाजे २९ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता या म्युझिक कंपनीला पहिल्या तीन वर्षात १७० रुपये प्रति चौरस फूट मासिक भाडे द्यावे लागणार आहे. भाडेपट्टी करारामध्ये पुढील दोन वर्षात भाडे १५ टक्क्यांनी वाढवून ते दरमहा १९५.५० रुपये प्रति चौरस फूट करण्याची अट या करारात सामील आहे.

Bigg Boss 17:बिग बॉसच्या घरात राडा होणार; 'वीकेंड का वार'मध्ये आयशा खानवर बरसणार सलमान खान!

या कमर्शिअल प्रोजेक्ट्ला जूनमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून, डेव्हलपरने सप्टेंबरमध्ये या प्रॉपर्टीचा ताबा अमिताभ बच्चन यांच्याकडे सोपवला होता. भाडे करारानुसार, भाडेकरूला टॉवरमध्ये एकूण १२ कार पार्किंग स्लॉट मिळतील. यापैकी चार पार्किंग स्लॉट हे हाय-एंड लक्झरी एसयूव्हीसाठी असतील. वॉर्नर म्युझिक इंडियाचा सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी लॉक-इन कालावधी असेल, तर बच्चनसाठी लॉक-इन कालावधी संपूर्ण कार्यकाळासाठी असेल.

वॉर्नर म्युझिक इंडिया कंपनीने ८ डिसेंबर रोजी व्यवहाराच्या नोंदणीच्या वेळी १.०३ कोटी रुपयांचे डिपॉझिट जमा केले आहे. या प्रकरणी बच्चन यांच्या टीम आणि वॉर्नर म्युझिक इंडियाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. बच्चन कुटुंबाकडे मुंबईत अनेक मालमत्ता आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी त्यांची मुलगी श्वेता नंदा हिला मुंबईतील जुहू भागातील आलिशान बंगला 'प्रतीक्षा' भेट म्हणून दिला होता.

WhatsApp channel