Amitabh Bachchan felt Regret : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता वयाच्या ८२व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. वयाच्या या टप्प्यावरही अमिताभ बच्चन मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय आहेत. मनोरंजन विश्वातील जवळपास प्रत्येक कलाकारासोबत अमिताभ बच्चन यांनी स्क्रीन शेअर केली आहे. अभिषेकसोबत लग्न होण्याआधी ऐश्वर्यानेही अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले होते. मात्र, ऐश्वर्यासोबत एका चित्रपटात काम करण्याचा पश्चात्ताप झाल्याचे बिग बींनी म्हटले होते. आता त्यांनी असं का म्हटलं असावं, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता, ज्यावर त्यांनी स्वतः उत्तर दिलं.
२००४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटात बिग बींनी ऐश्वर्याच्या काकांची भूमिका निभावली होती. मात्र, हा चित्रपट करत असताना अमिताभ यांना खूप अवघडल्यासारखं झालं होतं. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातील या गोष्टी थेट बोलून दाखवल्या होत्या. ‘क्यो हो गया ना’ या चित्रपटातील भूमिकेवर अमिताभ बच्चन काहीसे नाखूशच होते. त्यांनी आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती.
अमिताभ बच्चन म्हणाले की, या चित्रपटाच्या दरम्यान त्यांना खूपच अवघडल्यासारखे वाटत होते. त्यांना चित्रपटातील भूमिकेशी काही दुमत नव्हते. मात्र, आपण अतिशय तरुण कलाकारांसोबत काम करतोय, याचं त्यांना खूप दडपण आलं होतं. ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्यासोबत काम करताना अमिताभ बच्चन यांच्यावर खूप दबाव आला होता. पण, या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना एका नव्या पिढीच्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय, याचा त्यांना आनंद देखील झाला होता.
ऐश्वर्या रायसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘ती नेहमीच एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री होती.’ अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्यासोबत 'हम किसी से कम नहीं', 'मोहब्बतें' आणि 'खाकी'सारखे अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमध्ये काम करताना अमिताभ यांनी ऐश्वर्यासोबतच्या केमिस्ट्रीबद्दल अनेक सकारात्मक गोष्टी सांगितल्या होत्या. अमिताभ यांनी विवेक ओबेरॉयसोबत काम करण्याचाही उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, विवेक आणि ऐश्वर्या सेटवर खूपच मोकळेपणाने वावरत होते आणि प्रेक्षकांना पडद्यावर दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री देखील पाहायला मिळाली.
मात्र, 'क्यों हो गया ना' या चित्रपटाच्या वेळीच ऐश्वर्या आणि विवेकच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. या चित्रपटानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात अनेक बदल झाले. या बदलांचे साक्षीदार स्वतः अमिताभ बच्चन होते. प्रत्येक अभिनेत्याला त्याच्या कारकिर्दीत अशा अनुभवांना सामोरे जावे लागते, ज्याचा त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, असेही अमिताभ बच्चन महानले होते.
संबंधित बातम्या