गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. आतापर्यंत या बातमीवर बच्चन कुटुंबीयांच्या वतीने थेट काहीही सांगण्यात आलेलं नाही, पण आता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमिताभ बच्चन यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. "वेगळं होण्यासाठी खूप धाडस, दृढ निश्चय आणि सत्य लागतं. मी माझ्या कुटुंबाबद्दल खूप कमी बोलतो कारण ते माझे डोमेन आहे आणि मी त्यांची गोपनीयता राखावी लागते. अफवा म्हणजे केवळ अफवा... त्या बिनबुडाच्या, खोट्या आहेत" असे अमिताभ यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, “साधकांकडून त्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती आणि ते कोणत्या व्यवसायात आहेत याची पडताळणी केली जाते. मला त्यांच्या आवडीच्या व्यवसायात येण्याच्या इच्छेला आव्हान देण्याची गरज नाही... आणि समाजाच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. परंतु खोटे बोलणे आणि निवडक प्रश्नविचारकरणारी माहिती त्यांच्यासाठी कायदेशीर संरक्षण ठरू शकते... पण या प्रश्नचिन्हातूनच संशयास्पद श्रद्धेचे बीज पेरले जाते.”
सोशल मीडियावर सुरु असलेल्या अफवांवर देखील बिग बींनी संताप व्यक्त केला आहे. "तुम्हाला जे काही व्यक्त करायचे आहे, ते लिहा... पण जेव्हा तुम्ही त्यावर प्रश्नचिन्ह उभे करता तेव्हा तुमचे फक्त लिखाण शंकास्पद असू शकतं असं म्हणत नाही... किंबहुना वाचकांनी त्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्या लिखाणाला महत्त्व मिळावे म्हणून ते लिहिले जाते अशी तुमची इच्छा आहे. तुमचा कंटेंट पूर्ण आहे, फक्त त्या एका क्षणासाठी नाही, तर अनेक क्षणांसाठी. तुमच्या आशयाला महत्त्व मिळतं, पण तुमच्या लिखाणाच्या विषयाचा -व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर काय परिणाम झाला आहे, हे कळत नाही. एकेकाळी विवेक होता. तो आता निघून गेलाय.
वाचा: ए. आर. रेहमान गिटारवादक मोहिनीला करतोय डेट? दोघांनीही एकाच वेळी घटस्फोटाची घोषणा केल्याने चर्चांना उधाण
अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवांना तेव्हा अधिक बळ मिळाले जेव्हा ऐश्वर्या बच्चन कुटुंबाशिवाय अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित होती. आता आराध्याच्या वाढदिवशी ऐश्वर्या आणि अभिनेषेक पुन्हा एकत्र दिसले. त्यामुळे या कपलमध्ये नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.