बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. इतकंच नाही तर दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीही आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एक काळ असा होता जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी बिग बींना त्यांची कार ढकलायला सांगितली होती. इतकंच नाही तर सतत उशिराने येणाऱ्या अमिताभ यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी चांगलेच खडसावले होते. आता हा गाडीचा नेमका काय किस्सा आहे चला जाणून घेऊया...
यादों की बारात या शोमध्ये अमिताभ यांनी हजेरी लावली. या शोमध्ये त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. या शोमध्ये बिग बी म्हणाले होते, 'शत्रुघ्नमध्ये अनेक खास गुण आहेत जे मी आजही सांगू शकतो. मला सगळीकडेच उशीरा येण्याची सवय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण तो आज इथे अर्धा तास आधी आला.' यावर शत्रुघ्न हसतात आणि म्हणतात की, मी पहिल्यांदाच त्यांच्यासमोर आज लवकर आलो आहे.
बिग बींनी शान आणि नसीब या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेबद्दल सांगितले. "आम्ही शिफ्टमध्ये काम करायचो. शान चित्रपटाची ७-२ शिफ्ट झाली होती आणि नसीब चित्रपटाचे चित्रीकरण २ ते १० वाजेपर्यंत होते. फिरते थिएटर असलेल्या फिल्म सिटी आणि नसीब की चांदिवली स्टुडिओमध्ये शानचे चित्रीकरण करण्यात आले. शूटिंगसाठी मी सकाळी ७ वाजता पोहोचायचो आणि ११-१२ वाजता पॅकअप करून दुसऱ्या शूटिंगला जायचो. मी म्हणयचो की आपण दुसऱ्या शूटला जाऊया, तो म्हणायचा हो जाऊया ना. दुपारी २ वाजता आम्ही चांदिवली स्टुडिओला निघालो, ते थेट संध्याकाळी ६ वाजता पोहोचलो" असे अमिताभ म्हणाले.
वाचा: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान
या कार्यक्रमात बिग बींनी आणखी एक किस्सा सांगितला. 'आमच्याकडे एक कार होती जी त्यांची होती. ती एक छोटी तुटलेली गाडी होती. चित्रपट पाहण्यासाठी वांद्रेहून कुलाब्याला जायचं असेल तर आम्ही सगळे मिळून गाडीत बसायचे आणि वाटेत अनेकदा गाडी खराब व्हायची. ते गाडीत बसून आम्हाला धक्का देण्यास सांगत असत. मीही मरीन ड्राइव्हवर धक्के मारत असे आणि तो गाडीत आराम करायचा. वर म्हणायचा की व्यवस्थित धक्का मार' असे अमिताभ म्हणाले.
संबंधित बातम्या