अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का

अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 26, 2024 07:43 AM IST

अमिताभ बच्चन यांनी 'कल्कि २८९८' या चित्रपटानंतर नवी प्रॉपर्टी खरेदी केल्याचे समोर आहे. आता त्यांची ही प्रॉपर्टी कुठे आहे? चला जाणून घेऊया...

Amitabh Bachchan: अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी
Amitabh Bachchan: अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी

बॉलिवूड अभिनेत अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. ते मुंबईत सतत नवीन प्रॉपर्टी खरेदी करत असतात. आता देखील अमिताभ यांनी तीन नवीन ऑफिस खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. आता हे ऑफिस कुठे आहेत? याची किंमत किती असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

कुठे आहे अमिताभ यांची नवी प्रॉपर्टी

अमिताभ यांनी अंधेरीमधील पॉश एरिया वीरा देसाई रोड जवळील वीर सावरकर सिग्नेचर बिल्डींगमध्ये ही तीन ऑफिसे खरेदी केली आहेत. फ्लोरटॅप.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ यांनी या तीन ऑफिस यूनिटसाठी ५९.५८ कोटी रुपये मोजले आहेत. या तिन्ही ऑफिसचा एरिआ हा ८४२९ क्वेअर फूट आहे.
वाचा: शर्वरी वाघचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' होणार ओटीटीवर प्रदर्शित? वाचा कधी आणि कुठे

अमिताभ बच्चन यांची ही डील २० जून २०२४ रोजी झाली आहे. या कमर्शियल प्रॉपर्टीसाठी अमिताभ यांनी ३.७५ कोटी रुपये स्टॅम ड्यूटी भरली आहे. या तीन ऑफीससोबतच कार पार्किंगला देखील जागा देण्यात आल्याचे प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. ही कमर्शियल प्रॉपर्टी अमिताभ यांनी वीर सावरकर प्रोजेक्ट्स प्रायवेट लिमिटेड येथे खरेदी केली आहे.
वाचा: 'या' कारणामुळे वर्षातून ६ महिने आईसोबत एका घरात राहते सई ताम्हणकर

अमिताभ यांच्या आधी अभिषेकने खरेदी केली प्रॉपर्टी

अभिषेक बच्चन याने मुंबईतील बोरिवली परिसरातील ओबेरॉय रियॅल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पात १५.४२ कोटी रुपयांना सहा फ्लॅट खरेदी केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्याने ३१,४९८ रुपये प्रति चौरस फूट दराने एकूण ४,८९४ चौरस फूट रेरा कार्पेटचे हे फ्लॅट खरेदी केले आहेत. बोरिवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर हे सहा अपार्टमेंट आहेत. २८ मे २०२४ रोजी या सहा अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली असून, त्यात १० कार पार्किंगची सुविधा आहे.
वाचा: अद्वैतने सर्वांसमोर कलाच्या गळ्यात घातले मंगळसूत्र, आजच्या भागात काय घडणार?

अमिताभ यांच्या कामाविषयी

अमिताभ बच्चन हे त्यांच्या आगामी कल्कि 2898 एडी या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. अमिताभ यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि प्रभास महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.

Whats_app_banner