मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बिग बींनी शेअर केला सुनेचा कान्स फेस्टिवलमधील फोटो, म्हणाले..
अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन (HT)
20 May 2022, 6:32 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 6:32 AM IST
  • बिग बींनी शेअर केला सुनेचा कान्स फेस्टिवलमधील फोटो, म्हणाले..

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकताच अमिताभ यांनी सून ऐश्वर्या राय बच्चनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जगातील सगळ्यात जुना आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल. या फेस्टिवलला मंगळवारी सुरुवात झाली. ७५ वर्षांपासून चालत आलेल्या या फेस्टिवलला काही बॉलिवूड अभिनेत्रींनी हजेरी लावली. या यादीमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चनचा देखील समावेश आहे. कान्सच्या रेडकार्पेटवर ऐश्वर्याने तर जणू काही जादूच केली होती.

आता अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आराध्याने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ऐश्वर्याने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे तर अभिषेक काळ्या रंगाच्या सूटबूटात दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी मुलगा, सून आणि नात असे कॅप्शन दिले आहे.

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. दीपिका पादूकोणची या वर्षीची ज्युरी मेंबर म्हणून निवड झाली आहे. तर राजस्थानी गायक मामे खान कान्स फिल्म फेस्टिवलमधील रेड कार्पेटवर परफॉर्म करणारा पहिला लोक कलाकार ठरला आहे. दीपिका आणि मामे खान यांच्या सोबत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, शेखर कपूर, पूजा हेगड़े, नवाजुद्दीन सिद्दीकी, तमन्ना भाटिया, आर माधवन, एआर रहमान, प्रसून जोशी, वाणी त्रिपाठी, रिकी केज या कलाकारांनी कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook