Amitabh Bachchan Love Story On KBC 16: बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती १६' हा शो खूप पसंत केला जात आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना ज्ञान तर मिळतेच, पण ‘बिग बी’ आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से ही सर्वांना सांगतात. आता नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी स्पर्धकांसमोर आपली लव्हस्टोरी, त्यांचे आणि जया बच्चन यांच्यातील रोमान्स कसा सुरू झाला, आधी कोणी प्रपोज केले आणि लग्नापूर्वी-लग्नानंतर ते जया यांना प्रेमाने काय म्हणायचे याबद्दल सांगितले.
स्पर्धक काजोलने अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला की, ‘लग्नाआधी तुम्ही जया बच्चन यांना काय म्हणायचात आणि लग्नानंतर त्यांना कोणत्या नावाने हाक मारता?’ यावर उत्तर देताना ‘बिग बी’ म्हणाले की, त्यांचे जे नाव होते, त्याच नावानी मी त्यांना हाक मारायचो. तेव्हा स्पर्धकाने विचारले की, तुम्ही त्यांना आधीपासून जयाजी म्हणायचात का? त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, 'लग्नानंतर मी त्यांना जयाजी म्हणायला लागलो, कारण मी त्यांचा पत्नी म्हणून खूप आदर करतो.'
यानंतर बिग बींना विचारण्यात आलं की, आधी कोणी कोणाला प्रपोज केलं, तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले ली, ‘आम्ही असंच भेटायचो. आमचा एक ग्रुप होता, सगळे भेटायचो आणि खूप फिरायचो. आमचा एकत्र चित्रपट होता ज्यात आणि एकत्र काम केलं होतं. त्याचं नाव होतं जंजीर.’
‘बिग बीं'नी हा किस्सा सांगताना पुढे म्हटले की, ‘ते आणि त्यांचा ग्रुप अनेकदा म्हणत असत की, जंजीर हिट झाला, तर ते काहीतरी खास करतील.’ जेव्हा हा चित्रपट हिट झाला, तेव्हा त्याच्या सक्सेस पार्टीसाठी सर्वांनी लंडनला जाण्याचा बेत आखला होता. यानंतर जेव्हा घरात याबद्दल सांगण्यात आलं तेव्हा बिग बींच्या वडिलांनी अट घातली की, जया बिग बींसोबत जातील, मात्र आधी दोघांना लग्न करावं लागेल. यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत दोघांनी झटपट लग्न केले आणि नंतर ही जोडी लंडनला गेली.
तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज ४० वर्षांनंतरही अविरतपणे सुरू आहे. प्रत्येक सुख दुःखात अमिताभ बच्चन-ज्या नेहमीच एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहिले. बॉलिवूडमध्ये त्यांना ‘आयडियल कपल’ म्हटलं जातं.