Kalki 2898 AD Review: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kalki 2898 AD Review: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Kalki 2898 AD Review: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Jun 27, 2024 10:27 AM IST

Kalki 2898 AD Review: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादूकोणचा 'कल्की 2898 एडी’ हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वाचा सिनेमाचा रिव्ह्यू

Kalki 2898 AD Review: 'कल्की 2898 एडी’ रिव्ह्यू
Kalki 2898 AD Review: 'कल्की 2898 एडी’ रिव्ह्यू

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला 'कल्की 2898 एडी’ हा २०२४ या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. या चित्रपटाच्या अडवान्स बुकींगने सर्वांचे लक्ष वेधले होते. आज २७ जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

अमेरिकेत प्रदर्शित झाला पहिला शो

'कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचा पहिला शो अमेरिकेतील एका थिएटरमध्ये पार पडला. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रभासच्या एण्ट्रीला तर प्रेक्षकांनी अक्षरश: टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला. चला जाणून घेऊया चित्रपटाची कथा नेमकी काय आहे?
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर दिसणार एकत्र! जाणून घ्या त्यांच्या चित्रपटाविषयी

काय आहे चित्रपटाची कथा?

'कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची कथा कुरुक्षेत्रामध्ये सुरु होते. कथेच्या सुरुवातीलाच भगवान कृष्ण हे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाला शाप देतात. हा शाप जीवनातील अनंत काळासाठी असतो. त्याला या शापातून तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा तो कल्कीला भविष्यातील जन्मात मदत करेल. तोपर्यंत अश्वत्थमाला जीवनात प्रचंड दु:ख सहन करावे लागणार आहे. त्यानंतर चित्रपटाची कथा ही ६००० वर्षे पुढे जाते. त्यावेळी अश्वत्थामा स्वत:ला काशीच्या आधुनिक जगात शोधतो. या काळात सर्व काही पैशांऐवजी इलेक्ट्रीक युनिटवर चालते. या सगळ्यात कमल हासन साकारत असलेले पात्र हे एका मोहिमेवर असते. ही मोहिम अतिशय महत्त्वाची आणि तितकीच धोकादायक असते. प्रभास आणि दीपिका हे काशीमध्ये राहणारे एक आनंदी कपल आहे. आता अश्वत्थामा या शापातून मुक्त होतो का? कमल हासन यांची मोहिम नेमकी आहे तरी काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.
वाचा: गौरव मोरेच्या 'अल्ल्याड पल्ल्याड'ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ

कलाकारांच्या भूमिका

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. तर प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्री दीपिका पादूकोणने सुमथीची भूमिका साकारली आहे. सुमथीच्या पोटी कल्कीचा जन्म होणार असतो. भैरव हा सुमथीची गरोदरपणात काळजी घेत असतो.
वाचा: अभिषेक बच्चन पाठोपाठ अमिताभ यांनी खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी, किंमत ऐकून बसेल धक्का

कल्की चित्रपटाचे अडवान्स बुकींग

'कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने भारतात अडवान्स बुकींगच्या माध्यमातून जवळपास १९ लाख रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट येत्या काळात बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम करण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट १०० कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. तसेच जगभरात २०० कोटी रुपयांचा पल्ला पार करेल असे ही म्हटले जात आहे. तेलुगू भाषेत कल्की चित्रपटाची १५ लाख तिकिटे विकली गेली आहेत. देशभरात सर्व भाषांमध्ये जवळपास चित्रपटाची ५५ कोटी तिकिटे विकली गेली आहेत.

Whats_app_banner