मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गेल्या वर्षी ज्या पुरस्काराला दिला होता नकार, यंदा त्याच पुरस्काराने अमिताभ बच्चन सन्मानित

गेल्या वर्षी ज्या पुरस्काराला दिला होता नकार, यंदा त्याच पुरस्काराने अमिताभ बच्चन सन्मानित

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 25, 2024 08:58 AM IST

बुधवारी अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मात करण्यात आले. हा पुरस्कार ए आर रहमान आणि रणदीप हुड्डा यांना देखील देण्यात आला.

अमिताभ बच्चन यांना मिळाला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, रहमान आणि रणदीप हुड्डा देखील सन्मानित
अमिताभ बच्चन यांना मिळाला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, रहमान आणि रणदीप हुड्डा देखील सन्मानित

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना बुधवारी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे २०२२मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ कुटुंबीयांनी आणि ट्रस्टने या पुरस्काराची सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यांच्याशिवाय संगीत दिग्दर्शक एआर रहमान आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांना देखील या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वी अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि गायिका उषा उत्थप यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८१ वर्षीय अमिताभ बच्चन यांना संगीताचे दिग्गज आणि मंगेशकर कुटुंबीयांसमोर हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार घेतानाचे बिग बींचे फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये बीग बी अतिशय आनंदी असल्याचे दिसत आहे.
वाचा: कला आणि अद्वैतमध्ये निर्माण झाली जवळीक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

बिग बींनी मागितली हृदयनाथ मंगेशकरांची माफी

पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला. 'मी स्वत:ला अशा पुरस्कारांच्या लायक समझले नव्हते. पण, हृदयनाथ यांनी मी इथे यावे यासाठी प्रचंड मेहनत आणि प्रयत्न केले. हृदयनाथ जी मी सर्वात आधी तुमची माफी मागतो. मी तुम्हाला त्यावेळी बरे नसल्याचे सांगितले होते. पण माझी प्रकृती एकदम ठीक होती. मला इथे यायचे नव्हते. यावर्षी माझ्याकडे कोणतेही कारण नव्हते. त्यामुळे मला यावे लागले' असे अमिताभ म्हणाले.
वाचा: माधवीने मुक्ता हिच्याकडून घेतले दिल्लीला जाण्याचे वचन, सई जाणार का सोबत? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नवे वळण

कार्यक्रमाला आशा भोसले गैरहजर

मंगेशकर कुटुंबातील बहिण-भावांनी अमिताभ बच्चन यांना पुरस्कारने सन्मानित केले. पहिले, लता मंगेशकर यांची दुसरी बहिण आणि गायिका आशा भोसल यांना बिग बींना पुरस्कार देऊन सन्मानित करायचे होते. पण त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्या कार्यक्रमाला गैरहजर होत्या.
वाचा: 'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळतो?

लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार दरवर्षी अशा व्यक्तीला दिला जातो जी देशासाठी, समाजाप्रती आणि त्यांच्या लोकांप्रती योगदान देते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. २०२३मध्ये हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आला होता.

IPL_Entry_Point

विभाग