रेखा अन् जया सोडून महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रेखा अन् जया सोडून महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल

रेखा अन् जया सोडून महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 30, 2024 09:12 AM IST

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात असणाऱ्या महिलांबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण एकेकाळी त्यांना रेखा आणि जया बहादुरी दोघीही आवडत होते. शिवाय ते एका मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात होते.

रेखा अन् जया सोडून या महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल
रेखा अन् जया सोडून या महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. बिग बी आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. तसेच अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्याही अनेक चर्चा आहेत. पण आता रेखा आणि जया सोडून अमिताभ यांचे एका महाराष्ट्रीयन मुलीवर प्रचंड प्रेम असल्याचे समोर आले आहे. बिग बींच्या एका मित्रानेच याबाबत पोलखोल केली होती.

एकवेळ अशी होती की अमिताभ हे कोलकातामध्ये राहात होते. त्यावेळी ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या या मुलीवर प्रचंड प्रेम होते. ती मुलगी ब्रिटिश कंपनी आयसीआयमध्ये काम करत होती. ती मुलगी आणि अमिताभ हे एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते. अमिताभ यांच्या या अफेअरची माहिती त्यांचा मित्र दिनेश कुमारने दिली होती.
वाचा: 'नमस्कार वहिनी', फोटोग्राफर्सने आवाज देताच आलियाने दिली अशी प्रतिक्रिया

दिनेश कुमार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, "कोलकातामध्ये राहत असताना अमिताभ बच्चन एका महाराष्ट्रीय मुलीच्या प्रेमात पाडले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना १५०० रुपये पगार होता आणि त्या मुलीला देखील ४०० रुपये महिन्याला पगार मिळत होता. अमिताभ बच्चन यांना मुलासोबत लग्न करायची इच्छा होती. पण गोष्टी पुढे मनासारख्या पुढे सरकत नसल्यामुळे बिग बींनी ती नोकरी आणि कोलकाता दोन्ही सोडले. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली."
वाचा: ओंकार भोजने दिसणार महेश मांजरेकरांसोबत, सिनेमाच्या पोस्टने वाढवली उत्सुकता

पुढे त्यांनी सांगितले की, "अमिताभ बच्चन ज्या मुलीच्या प्रेमात पडले होते त्या मुलीने बंगाली सिनेमांतील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत संसार थाटला. मी आणि बिग बींनी जवळपास तीन वर्षे ब्लॅकर अँड कंपनीमध्ये काम केले. बंगली अभिनेत्यामुळे त्या मुलीने बिग बींना नकार दिला नव्हता. तर काही कौटुंबिक कारणांमुळे तिला बिग बींसोबत लग्न करता आले नाही."

बिग बी आणि ती महाराष्ट्रीयन मुलगी अनेक वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यांची पहिली भेट ही कोलकातामध्ये एका नाटकाच्या वेळी झाली होती. पहिल्याच भेटीत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. पण कुटुंबीय आणि इतर गोष्टींमुळे त्यांना लग्न करता आले नाही. १९६८ साली त्या मुलीने बिग बींना नकार दिला. जेव्हा बिग बींचा ब्रेकअप झाला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता.

Whats_app_banner