बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचे जगभरात चाहते असल्याचे पाहायला मिळतात. शाहरुख खानची एक पोझ अतिशय प्रसिद्ध आहे. अनेकजण ही पोझ देऊन फोटो काढतात आणि शाहरुखला टॅग करताना दिसतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी शाहरुखची नक्कल केली आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील संभाषण देखील सर्वांचे कायम लक्ष वेधून घेताना दिसते. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन हे शाहरुख खानची चक्क नक्कल करताना दिसले. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी शाहरुख खानचा उल्लेख केला. त्यावेळी एका बँकेत काम करणारी रश्मी अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर बसली होती. शाहरुखशी संबंधित प्रश्न आला तेव्हा बिग बींना किंग खानची आठवण झाली. रश्मी म्हणाली की, तिचा सुपरहिरो अमिताभ बच्चन आहेत. त्यानंतर बिग बींनी शाहरुखचा पुन्हा उल्लेख करत त्याची सिग्नेचर पोझ देखील दाखवली.
बिग बॉससमोर रांचीची रश्मी कुमारी हॉट सीटवर होती. अमिताभ बच्चन यांनी त्यांना शाहरुख खानशी संबंधित एक प्रश्न विचारला. यासोबतच शाहरुखचा एक फोटो दाखवण्यात आला होता ज्यात त्याने मन्नतच्या गच्चीवर उभं राहून हात पसरून सिग्नेचर पोज दिली होती. अमिताभ बच्चन म्हणाले, 'हा फोटो त्यांच्या घरचा, मन्नतचा आहे. घर मन्नतच्या बाहेर त्यांचे लाखो चाहते त्यांच्या दर्शनासाठी येतात. त्यांनी खूप उंच गंची बांधली आहे, ते तिथे उभे राहून असे पोज देतात आणि लोक वेडे होतात.' बिग बींनी दोन्ही हात पसरून पोज ही दाखवली.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
रश्मीने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तिला लहानपणी कॉमिक्सची खूप आवड होती. त्यातही सुपरहिरो कॉमिक्स सर्वाधिक वाचली गेली. त्यांचा आवडता कॉमिक हिरो होता सुप्रीमो. रश्मी म्हणाली, तो दिवसा आणि संध्याकाळी अभिनय करायचा... सर, तुम्ही ते सुपरहिरो आहात. तू तेव्हा हिरो होतास, आज हिरो आहेस. चॅनलने या क्लिपचा प्रोमो शेअर केला आहे ज्यात बिग बींच्या शहेनशाह चित्रपटाचे संगीतही ऐकू येत आहे.