Kaun Banega Crorepati 16: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो प्रचंड गाजत आहे. या शोचा सध्या १६वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, तरीही अनेकदा काही जुने एपिसोड देखील ट्रेंड होताना दिसतात. या शोमध्ये अनेकदा महाभारत आणि रामायणासारख्या पौराणिक कथांशी संबंधित प्रश्न विचारले जातात. 'केबीसी'च्या १२व्या सीझनमध्येही असा प्रश्न विचारण्यात आला होता. हॉट सीटवर मुंबईचा जय कुलश्रेष्ठ बसला होता आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्याला ४० हजार रुपयांसाठी 'महाभारता'शी संबंधित प्रश्न विचारला होता.
प्रश्न: महाभारतानुसार, चंद्र देवपुत्राचा अवतार खालीलपैकी कोण होता, ज्याला केवळ १६ वर्षांसाठी पृथ्वीवर पाठविण्यात आले होते?
उत्तरासाठी पर्याय: ए) अभिमन्यू
बी) घटोत्कच
सी) परीक्षित
डी) पांडू
महाभारताशी संबंधित हा प्रश्न विचारल्यानंतर अमिताभ यांनी जयला उत्तरासाठी चार पर्यायही दिले होते. मात्र, या प्रश्नाचं उत्तर जयकडे नव्हतं. जयच्या मनात अनेक गोष्टी येऊ लागल्या आणि तो गोंधळून गेला. अशावेळी त्यांनी धोका न पत्करता ५०:५० लाईफलाईनचा वापर केला. या लाईफलाईनमुळे चारपैकी दोन चुकीची उत्तरे गायब झाली.
जयने ५०:५० लाईफलाईन निवडल्यानंतर बी) घटोत्कच आणि सी) परीक्षित हे पर्याय काढून टाकण्यात आले. अशा स्थितीत ए) अभिमन्यू आणि डी) पांडू असे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते. जयने अभिमन्यू हा पर्याय निवडला आणि ४०,००० रुपयांची रक्कम जिंकली. जयने त्या दिवशी आपल्या हुशारीने एकूण १२,५०,००० रुपये जिंकले होते. या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर जयने मनातील भावना व्यक्त करताना सांगितले होते की, ज्या दिवशी लॉकडाऊनदरम्यान त्याची नोकरी गेली त्या दिवशी त्याला केबीसीचा फोन आला आणि त्याला सांगण्यात आले की, त्याची केबीसीसाठी निवड झाली आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ हा क्विझ शो हा टीव्ही विश्वातील सर्वात आवडता शो ठरला आहे. लोकांना हा शो जितका आवडतो तितकीच या शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनाही प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळालेली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ शोचा पुढचा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘केबीसी'च्या १६व्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.