Kalki 2898 AD: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kalki 2898 AD: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार

Kalki 2898 AD: कल्की २८९८ एडी 'या' दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Aug 17, 2024 06:47 PM IST

Kalki 2898 AD Netflix: अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण यांचा कल्की २८९८ एडी हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चला जाणून घेऊया कुठे आणि कधी प्रदर्शित होणार...

Kalki 2898 AD
Kalki 2898 AD

नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांचा हा चित्रपट लोकांना आवडला आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होणार हे जाणून घ्या...

प्रभासचा कल्की २८९८ एडी कधी प्रदर्शित होणार?

कल्की २८९८ एडी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबतची माहिती नेटफ्लिक्सने एक्स अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. या अकाऊंटवर कल्की २८९८ एडीची एक क्लिप शेअर करण्यात आली आहे. ही क्लिप शेअर करत, 'या युगातील एपिक ब्लॉकबस्टर नेटफ्लिक्सवर येत आहे, हिंदीत. कल्की २८९८ एडी हा चित्रपट २२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ते ही हिंदीमध्ये' असे कॅप्शन देण्यात आले आहे.

 

कल्की २८९८ एडी चित्रपटाची काय आहे कथा?

'कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची कथा कुरुक्षेत्रामध्ये सुरु होते. कथेच्या सुरुवातीलाच भगवान कृष्ण हे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाला शाप देतात. हा शाप जीवनातील अनंत काळासाठी असतो. त्याला या शापातून तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा तो कल्कीला भविष्यातील जन्मात मदत करेल. तोपर्यंत अश्वत्थमाला जीवनात प्रचंड दु:ख सहन करावे लागणार आहे. त्यानंतर चित्रपटाची कथा ही ६००० वर्षे पुढे जाते. त्यावेळी अश्वत्थामा स्वत:ला काशीच्या आधुनिक जगात शोधतो. या काळात सर्व काही पैशांऐवजी इलेक्ट्रीक युनिटवर चालते. या सगळ्यात कमल हासन साकारत असलेले पात्र हे एका मोहिमेवर असते. ही मोहिम अतिशय महत्त्वाची आणि तितकीच धोकादायक असते. प्रभास आणि दीपिका हे काशीमध्ये राहणारे एक आनंदी कपल आहे.

चित्रपटाची कथा जगातील सर्वात जुने शहर असलेल्या काशीपासून सुरू होते, जे आता जगातील शेवटचे शहर आहे. या शहरातील अनेक समस्या दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे बजेट हे जवळपास ६०० कोटी रुपये आहे.
वाचा: हॉलिवूड व टॉलिवूडमधील थ्रिलर चित्रपट मराठीमध्ये पाहायचे? मग 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळणार पाहायला

चित्रपटातील कलाकार

६०० कोटी रुपये बजेट असलेल्या या कल्की २८९८ एडी या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. तर प्रभास भैरवच्या भूमिकेत दिसला आहे. दीपिका पदुकोण या चित्रपटात सुमतीची भूमिका साकारत आहे. अमिताभ, प्रभास आणि दीपिका व्यतिरिक्त कमल हासन, स्वस्तचॅटर्जी, दिशा पटानी, शोभना, विनय कुमार आणि मृणाल ठाकूर या कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.

Whats_app_banner