बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे सतत चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून बिग बी हे नव्या संपत्ती खरेदी करताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी मुंबईत १० नवे फ्लॅट खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या दहा फ्लॅटची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
अमिताभ बच्चन आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन यांनी मुंबईतील मुलुंड परिसरात १० नवे फ्लॅट खरेदी केले आहेत. या फ्लॅटची किंमत २४.९५ कोटी रुपये आहे. रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार ओबेरॉय एटेर्निया नावाच्या प्रकल्पात बिग बींनी १० फ्लॅट खरेदी केले आहेत. ओबेरॉय रियल्टीचा प्रोजेक्ट एटेर्नियामध्ये रेडी-टू-मूव्ह-इन ३ बीएचके आणि ४ बीएचतके अपार्टमेंट आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांनी १० फ्लॅट खरेदी केले आहेत. प्रत्येकी १०,२१६ क्वेअर फूटचा हा फ्लॅट आहे. या १० फ्लॅटला २० कार पार्किंगची जागा देण्यात आली आहे.
आठ फ्लॅटचे कार्पेट एरिया प्रत्येकी १०४९ चौरस फूट आणि दोन फ्लॅटचे क्षेत्रफळ ९१२ चौरस फूट प्रति युनिट आहे. १० फ्लॅटसाठी १ कोटी ५० लाख रुपये द्यावे लागले आहेत. तीन लाख रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली होती. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली होती. स्क्वेअर यार्ड्सच्या मते, मुलुंड पश्चिम भाग हा विकसीत होत आहे. त्यामुळे येथे सर्व सोयी सुविधा आणि हिरवळ देखील आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चनने सहा फ्लॅटसाठी १४.७७ कोटी रुपये दिले आहेत. अमिताभ बच्चन यांनी उर्वरित चार फ्लॅट खरेदी केले आहेत.
बच्चन दाम्पत्याने २०२० ते २०२४ या कालावधीत रिअल इस्टेटमध्ये २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने ओशिवरा आणि बोरिवली पूर्व येथील मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही जागांचा समावेश आहे.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि कुटुंबीयांनी रिअल इस्टेटमध्ये १५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. स्क्वेअरयार्ड्सने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, अजय देवगण आणि काजोलने ११० कोटी रुपये आणि शाहिद कपूरने ५९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर जान्हवी कपूरने १६९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
संबंधित बातम्या