Amit Bhanushali Online Fraud Scam: ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली घराघरांत लोकप्रिय झाला आहे. अभिनेता अमित भानुशाली हा ‘ठरलं तर मग’ या मालिकेत ‘अर्जुन’ ही भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारा अभिनेता अमित भानुशाली याने आज एक अशी पोस्ट शेअर केली आहे, जी वाचून त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. अमित भानुशाली अर्थात अर्जुन याच्या नावावर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणाचा खुलासा स्वतः अभिनेता अमित भानुशाली याने केला आहे. त्याने आपल्या अकाऊंटवर या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे.
सोशल मीडियाच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन स्कॅम होण्याचे प्रकार सध्या वाढत चालले आहेत. सर्वसामान्य लोकांना निशाणा बनवत असे लोक सगळ्यांना लुटत आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेता अमित भानुशाली याच्यासोबत घडला आहे. या प्रकारामुळे स्वतः अभिनेत्याला मोठा धक्का बसला असून, त्याने आपल्या चाहत्यांना देखील सावध केले आहे. या संदर्भात त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने या स्कॅम करणाऱ्या एका प्रकरणाचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. या मध्ये अमित भानुशाली याच्या नावाने एक अकाऊंट सुरू करून, त्याद्वारे कुणाच्या तरी मदतीसाठी पैसे जमा करायचे असल्याचे म्हणत, सगळ्यांकडून पैशांची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता अमित भानुशाली याच्या नावाने फेक अकाऊंट उघडले आहे. ‘अमित भानुशाली फॅन’ असे या पेजचे नाव आहे. या इन्स्टाग्रामवर एक फॅन पेजने ‘अमित भानुशाली फॅनक्लब’ या नावाचं फॅन पेजवरून अमित भानुशाली याच्या नावाने पैसे मागितले असून, अनेकांची फसवणूक देखील केली आहे. या खोट्या अकाऊंटवरून अनेकांकडून पैशांची मागणी करण्यात आली आली आहे. काही लोक या फसवणुकीला बळी देखील पडले आहेत. यामुळेच आता स्वतः अभिनेत्याने पोस्ट करून, सगळ्यांना या स्कॅमची माहिती दिली आहे.
याबद्दल चाहत्यांना सतर्क करताना अमित भानुशाली याने लिहिले की, ‘मला या डोनेशनबद्दल काही माहीत नाही. कृपया कोणीही पैसे पाठवू नका. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीये. ही व्यक्ती मी नाहीये. या गैरप्रकाराशी माझा काहीही संबंध नाही. माझी सर्वांना विनंती आहे की, कृपया या व्यक्तीला कुणीही पैसे पाठवू नका किंवा आर्थिक व्यवहार करू नका.’
संबंधित बातम्या