3 Idiots: अमिर खानच्या ‘३ इडियट्स’मधील अभिनेत्याचे निधन
Akhil Mishra: वयाच्या ५८व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
चित्रपटसृष्टीमधील एक दु:ख बातमी समोर आली आहे. अभिनेता आमिर खानच्या '३ इडियट्स' या चित्रपटात काम करणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकार श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
समोर आलेल्या माहितीनुसार, अखिल मिश्रा यांचे निधन पाय घसरुन पडल्यामुळे झाले आहे. तर काही जण ते बालकनीमध्ये काम करत असताना पाय घसरुन खाली खोसळले आणि निधन झाल्याचे म्हणत आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: गौरी करणार लग्न, यशला बसला मोठा धक्का
अखिल मिश्रा यांच्या निधनाच्या वेळी त्यांची पत्नी सुजैन हैदराबाद येथे शूट करत होती. त्यांना ही दु:खद माहिती मिळताच त्या मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. सध्या अखिल मिश्रा यांचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पतीच्या निधनाची माहिती मिळतात सुजैन यांना धक्का बसला आणि त्या म्हणाल्या की, 'मला मोठा धक्का बसवा आहे. माझ्या शरीरिचा, मनाचा, हृदयाचा अर्धा भाग मी गमावला आहे.'
अखिल मिश्रा यांनी आजवर अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. भंवर, उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजानी आणि इतर काही मालिकांमध्ये ते दिसले होते. तसेच त्यांनी डॉन, वेल डन अब्बा. ३ इडियट्स, हजारों ख्वाहिशे अशा काही चित्रपटात काम केले आहे.
विभाग