Kiran Rao On Divorce With Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांनी १६ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर २०२१मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही ते दोघे एकत्र फिरतान, काम करताना दिसतात. त्या दोघांमध्ये चांगले बाँडिंग असल्याचे पाहायला मिळते. दोघेही अनेकदा कुटुंब आणि मुलासोबत वेळ घालवताना दिसतात. आता किरण रावने घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर आणि किरण 'लापता लेडीज' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट तुफान हिट ठरला. प्रेक्षकांना हा चित्रपट विशेष आवडला. आता घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर किरण राव पहिल्यांदाच बोलताना दिसली. तिने वेगळे झाल्यानंतर आनंद झाल्याचे सांगितले.
किरण रावने नुकतीच Faye D’Souzaच्या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये किरण रावने अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. खासगी आयुष्यापासून ते व्यावसायिक गोष्टींवर देखील मनसोक्त गप्पा मारल्या. 'मला असं वाटतं की वेळोवेळी तुम्हाला तुमचं नातं पुन्हा नव्याने जागं करण्याची गरज असते. कारण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे माणूस म्हणून आपण खूप बदलत जातो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. घटस्फोटानंतर मी खूप आनंदी आहे असे मला वाटते. याला तुम्ही आनंदी घटस्फोट म्हणू शकता' असे किरण राव म्हणाली.
पुढे किरण म्हणाली की, 'जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी बराच काळ सिंगल होते. लग्नाआधी मी माझं आयुष्य आणि स्वातंत्र्य पूर्णपणे एन्जॉय केलं. तेव्हा मला एकटेपणा वाटायचा, पण आता नाही कारण मी माझा मुलगा आझाद सोबत आहे. मला वाटते की घटस्फोटानंतर बहुतेक लोकांना एकटेपणा जाणवतो, परंतु मला ते कधीच जाणवले नाही कारण मला आमिर आणि माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. खरं तर, या फक्त चांगल्या गोष्टी आहेत. हा खूप आनंददायी घटस्फोट आहे.'
वाचा: मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे
'आम्हाला वेगळे होण्यासाठी एकच पेपर हवा होता. पण आम्हाला माहित आहे की आम्ही एकमेकांसाठी काय आहोत. आजही आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांचा खूप आदरही करतो. आमचा भूतकाळ आहे, जो मला कधीच गमावायचा नाही' असे किरण पुढे म्हणाली.
संबंधित बातम्या