मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ira-Nupur Wedding: मुंबईतील ‘या’ हॉटेलमध्ये होणार आमिरच्या लेकीचे लग्न, कोणते सेलिब्रिटी लावणार हजेरी?

Ira-Nupur Wedding: मुंबईतील ‘या’ हॉटेलमध्ये होणार आमिरच्या लेकीचे लग्न, कोणते सेलिब्रिटी लावणार हजेरी?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 03, 2024 08:14 AM IST

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानची लेक इरा खान ही आज ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. आता तिच्या लग्नसोहळ्याचे कोणत्या कलाकारांना आमंत्रण देण्यात आले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Ira Khan-Nupur Shikhare Wedding
Ira Khan-Nupur Shikhare Wedding

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्ट' अर्थात अभिनेता आमिर खानची लाडकी लेक इरा खान आज ३ जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. इरा खान फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. आता या सोहळ्याला कोणते कलाकारा हजर राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आमिर खान हा त्याच्या साधेपणामुळे विशेष ओळखला जातो. त्यामुळे लेकीचे लग्न तो कसे करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमिरने इराच्या लग्नसोहळ्याला काही मोजक्याच लोकांना आमंत्रण दिल्याचे म्हटले जात आहे. ताज लँडमध्ये होणाऱ्या इशाच्या रजिस्टर लग्नात केवळ खान आणि शिखरे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. त्यानंतर रिसेप्शनला ९०० लोकांना बोलवण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी उदयपुरमध्ये थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
वाचा: प्रभासची जादू ओसरली! 'सलार'ची कमाई कमी झाली

१३ जानेवारी रोजी आमिर खानने बॉलिवूड कलाकारांसाठी रिसेप्शन ठेवले आहे. हे रिसेप्शन जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. आता या रिसेप्शनला कोणते कोणते कलाकार हजर असणार? असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी आमिर सलमान खान आणि सायरा बानो यांच्या घरी लग्नाची पत्रिका द्यायला जाताना दिसला होता. त्यामुळे आता इतक कोणते कलाकार हजर असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नूपुर आणि इरा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. दोघेही एकत्र खूप क्युट दिसतात. इरा आणि नुपूर यांनी गतवर्षी १८ नोव्हेंबरला साखरपुडा केला होता. आता दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. नुपूर आणि इराच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. आमिर खानच्या दोन्ही पूर्व पत्नी म्हणजेच रीना दत्ता आणि किरण राव या लग्नासाठी नऊवारी नेसून सजल्या आहेत.

WhatsApp channel

विभाग