बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे. दोघांची जोडी नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील नेहमीच खूप खूश होतात. मात्र, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात काही महिन्यांपासून दुरावा येत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या बातम्यांमुळे चाहत्यांची खूप निराशा झाली होती. दरम्यान, अभिषेकचे वडील, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आयुष्यात सर्व गोष्टी किती क्षणिक आहेत हे सांगितले आहे.
‘मागच्या ब्लॉगमध्ये जो शेवटचा विचार आला होता, तो प्रतिबिंब याविषयीचा होता. हे ‘शेर’ त्याबद्दल सर्वकाही सांगतं. जेव्हा मी स्वत:ला आरशात पाहिलं, तेव्हा मी आश्चर्यचकीत झालो. आता मला आरशात जो चेहरा दिसतोय तो काही वर्षांपूर्वी खूप वेगळा होता. प्रत्येक रविवारी मी चाहत्यांना भेटण्यासाठी आतूर असतो. तरी प्रत्येक आठवड्यात मला याविषयी नवल वाटतं की कोणता चेहरा त्यांना जवळचा वाटत असेल? अशा चेहऱ्यालाही त्यांनी खूप प्रेम दिलंय. माझ्या खिडकीबाहेर मला चाहत्यांचे आवाज ऐकू येतात. ते ऐकून मी आशेनं स्वत:ला दिलासा देतो. पण आयुष्य आणि लोकांकडून मिळणारा हा प्रतिसाद यांचा अवधी कमी असतो. आयुष्य कोमेजून जातं आणि संपतं, तसंच लोकांकडून मिळणारं लक्षही एके दिवशी कोमेजून जातं आणि संपतं. या सगळ्यात एक समानता आहे.. हे सर्वकाही शेवटी संपतंच’ असे अमिताभ बच्चन म्हणाले.
पुढे गणेश चतुर्थीचा उल्लेख करत बिग बी म्हणाले, ‘गणपतीचा उत्सव सुरू झाला आहे आणि आशीर्वादासाठी देवाची प्रार्थना केली जातेय. देव आपल्या सर्वांना शांती आणि सिद्धी देवो. सर्वांच्या आयुष्यात भरभरून आनंद येवो. कारण आनंद हा अनंत आहे. गणपती विसर्जनासाठी समुद्राजवळ आलेल्या भक्तांचा उत्साह हा सर्वांत मौल्यवान आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून माझ्या चेहऱ्यावरील भावही बदलले.’
वाचा: बिग बॉस मराठीने बदलले शिव ठाकरेचे आयुष्य! किती रुपये मिळाले बक्षीस?
अलीकडेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या बातमीला जोरदार हवा मिळाली होती. या घटस्फोटाच्या बातम्यांना तेव्हा अधिक रंगत आली, जेव्हा ते दोघे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात स्वतंत्रपणे पोहोचले होते. ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या या लग्नाला एकत्र उपस्थित होत्या. तर, अभिषेक बच्चन मात्र त्याच्या आई, वडील आणि बहिणीसोबत लग्नात पोहोचला होता. अशातच सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याविषयीच्या गोष्टी समोर येऊ लागल्या होत्या.