तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
May 29, 2024 04:38 PM IST

'आम्ही जरांगे' या चित्रपटाची घोषणा केल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा आता टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Amhi jarange: 'आम्ही जरांगे' टीझर
Amhi jarange: 'आम्ही जरांगे' टीझर

मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचे नाव 'आम्ही जरांगे' असे आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काय आहे टीझर?

'आम्ही जरांगे' या चित्रपटाच्या एक मिनिटाच्या टीझरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाची झलक पाहायला मिळत आहे. टीझरची सुरुवात ही 'कर्म मराठा, धर्म मराठा' या लक्षवेधी डायलॉगने होत आहे. त्यानंतर धगधगत्या आगीतून मनोज जरांगे पाटील चालत येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर टीझरच्या शेवटी 'तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल!' असे मनोज जरांगे पाटील बोलताना दिसत आहेत.
वाचा: भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल

कोणते कलाकार दिसणार?

'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही गाजलेली सुप्रसिद्ध कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. तसेच नारायणा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. एकंदरीत चित्रपटाची स्टारकास्ट आणि टीझर पाहाता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;'गेला माधव कुणीकडे' नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा

शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे.
वाचा: 'मालिकेचे नाव बदला, अप्पी बिनडोक कलेक्टर ठेवा', मालिकेच्या प्रोमोवर वैतागरे प्रेक्षक

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच "गरजवंत मराठ्यांचा लढा" हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे अर्थातच 'आम्ही जरांगे' या चित्रपटाविषयीची उत्सुकता प्रदर्शना आधीपासूनच शिगेला पोहोचली आहे, येत्या १४ जूनला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
वाचा: कला आणि अद्वैत राहणार एकत्र, सरोजच्या मनाविरुद्ध आबांनी उचलले पाऊल

Whats_app_banner