Amey Wagh Movie: अमेय वाघ म्हणतोय 'आपण शोधायचं का... रोहित चव्हाणला?' काय आहे प्रकरण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amey Wagh Movie: अमेय वाघ म्हणतोय 'आपण शोधायचं का... रोहित चव्हाणला?' काय आहे प्रकरण

Amey Wagh Movie: अमेय वाघ म्हणतोय 'आपण शोधायचं का... रोहित चव्हाणला?' काय आहे प्रकरण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 16, 2024 07:55 AM IST

Amey Wagh upcoming Movie: अमेय वाघने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, ''आपण शोधायचं का... रोहित चव्हाणला?' असे म्हटले आहे. आता ही भानगड नेमकी काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Amey Wagh
Amey Wagh

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो. तो सतत काही ना काही मस्ती करताना दिसतो. कधी कलाकारांसोबत मजामस्ती करतो तर कधी त्यांच्यासोबत प्रँक करत असतो. सध्या सोशल मीडियावर अमेय वाघची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्याने 'जे व्हायरल नाही ते खरं कशावरून?' असे म्हटले आहे. आता ही भानगड नेमकी काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अमेयने सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही त्याच्या चित्रपटाशी संबंधीत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तुम्ही अगदी बरोबर ओळखले. हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. याच धाटणीवर आधारित 'लाईक आणि सबस्क्राईब' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली.

काय आहे अमेयची पोस्ट?

अमेय वाघने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर 'आपण शोधायचं का... रोहित चव्हाणला?' असे म्हटले आहे. पुढे 'लाईक आणि सबस्क्राईब' असे देखील म्हटले आहे. तसेच हे मोशन पोस्टर शेअर करत त्याने 'जे व्हायरल नाही ते खरं कशावरून? ‘लाईक आणि सबस्क्राईब’ ११ ऑक्टोबर पासून जवळच्या चित्रपटगृहात!' असे लिहिले आहे. एकंदरीत हे त्याच्या आगामी चित्रपटाशी संबंधीत असल्याचे म्हटले जात आहे.

अमेयने 'आपण शोधायचं का रोहित चौहानला? ' असा प्रश्न विचारण्याला असल्यामुळे हा रोहित चौहान नक्की कोण आणि त्याचा 'लाईक आणि सबस्क्राईब'शी काय संबंध? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहाता हा एक रहस्यपट असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना रोहित चौहानला जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.

कोणते कलाकार दिसणार?

'लाईक आणि सबस्क्राईब'चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
वाचा: लग्नात धोनीला मिठी मारणाऱ्या राधिका मर्चंटपेक्षा रणवीर-दीपिकाची जोरदार चर्चा, काय आहे कारण?

चित्रपटाचे दिग्दर्शक घोषणेबाबत म्हणतात, "सोशल मीडिया सध्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय बनला असून 'लाईक आणि सबस्क्राईब ' या दोन क्रिया आपण रोजच्या जीवनात करतच असतो. अगदी वयस्कांपासून लहान मुलांच्या तोंडी हे शब्द सर्रास असतात. अनेकांना प्रश्न पडला असेल, की हे 'लाईक आणि सबस्क्राईब', रोहित चौहान काय प्रकरण आहे, तर याचा उलगडा ११ ऑक्टोबरला होणार आहे.''

Whats_app_banner