मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kanye West: काय? या रॅपरने बसवले टायटेनियमचे दात, खर्च ऐकून व्हाल चकीत

Kanye West: काय? या रॅपरने बसवले टायटेनियमचे दात, खर्च ऐकून व्हाल चकीत

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 18, 2024 07:05 PM IST

Kanye West Titanium Teeth : टायटेनियमचे दात बसवण्यासाठी रॅपरने त्याचे खरे दात पाडून टाकले आहेत हे ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.

Kanye West
Kanye West

माणसाकडे पैसा असला की त्याला वेगवेगळ शौक सुचतात. मग ते उच्च प्रतीचे राहणीमान असो किंवा मग महागड्या वस्तू खरेदी करणे असो. श्रीमंत व्यक्ती सतत काही तरी वेगळ्या गोष्टी करताना दिसतात. या यादीमधील एक नाव म्हणजे अमेरिकन रॅपर कान्य वेस्ट. नुकताच या रॅपरने एक धक्कादायक प्रकार केला आहे. त्याने त्याचे संपूर्ण दात हे टायटेनियमचे बसवून घेतले आहेत. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला.

ट्रेंडिंग न्यूज

अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याने स्वतःला टायटेनियमचे दात बसवले आहेत. धक्कादायक म्हणजे त्याने नव्या दातांसाठी जुने खरेखुरे दात पाडून टाकले आहेत. त्याचे हे दात जेम्स बाँड चित्रपटातला विलन जॉर्जच्या दातांशी मिळते-जुळते आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र कान्ये वेस्टची चर्चा सुरु आहे. त्याने या सर्वासाठी किती पैसे खर्चे केले असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे.
वाचा: मिया खलिफाचे झाले इस्रायली महिलेशी भांडण, व्हिडीओ व्हायरल

दातांच्या इम्प्लांटमध्ये टायटेनियम हे अतिशय महत्त्वाचे समजले जाते. टायटेनियम शरीराला कोणतेही नुकसान पोहोचवत नाही. इतर प्रकरांच्या तुलनेत टायटेनिय हे अतिशय महाग आहे. रॅपर कान्ये वेस्टने देखील टायटेनियमचा वापर करुन दात बसवले आहेत. कान्ये वेस्टचे हे दात हिऱ्यांपेक्षाही महाग असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी त्याने जवळपास ७ कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कान्ये वेस्टने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला फोटो शेअर करत दातांच्या इम्प्लांटविषयी माहिती दिली आहे. त्याने स्टोरीला फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याने स्वत:ची तुलना द स्पाय हू लव्ह मी अँड मूनरकर चित्रपटातील आयकॉनित पात्राशी केली आहे. त्याचे हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग