Pataal Lok 2: सध्या अनेक वेब सीरिज या चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. त्यामध्ये 'पाताल लोक' या सीरिजचा देखील समावेश आहे. पहिला सिझन गाजल्यानंतर आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या सीरिजची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तसेच या नव्या सिझनमध्ये काय पाहायला मिळणार याविषयी देखील माहिती देण्यात आली आहे.
'पाताल लोक २' या बहुप्रतीक्षित वेब सीरिजशी संबंधित अपडेट समोर आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'पाताल लोक 2'मधील जयदीप अहलावतचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोबतच सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारीखही जाहिर करण्यात आली आहे. जयदीप अहलावतसोबत इश्वाक सिंग आणि गुल पनाग या क्राइम ड्रामा सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'पाताल लोक सीझन २' पुढील वर्षी १७ जानेवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे आठ भाग प्रदर्शित झाले आहेत. ही सीरिज २४० देशात प्रदर्शित झाली होती. या क्राइम-ड्रामा सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून प्रतिक्षा संपली आहे.
वाचा: वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी 'पाताल लोक २'चा टीझर रिलीज केला होता. टीझरमध्ये रक्ताने माखलेला जयदीप गुंडांशी भांडताना दिसत होता. एका शॉटमध्ये त्याच्या मनगटावर १५ डिसेंबर १९९७ ही तारीख टॅटूने काढलेली दाखवण्यात आली होती. या टॅटूने लोकांना हादरवून टाकले होते. मागील सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनची कथाही हाथीराम आणि इम्रान अन्सारी यांच्याभोवती फिरणार आहे. मात्र यावेळी तिलोत्तमा शोम आणि अनुराग अरोरा सारखे नवे कलाकार दिसणार आहेत.
संबंधित बातम्या