ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वांची आवडती आणि तुफान गाजलेली सीरिज म्हणजे 'मिर्झापूर.' या सीरिजचा नुकताच तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या बहुप्रतिक्षित वेब सीरिजने सर्वांची मने जिंकली आहेत. पण या सीरिजमधील कलाकारांनी किती मानधन घेतले? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
मिर्झापूर या सीरिजचे दोनही सिझन हिट ठरले गोते. त्यानंतर चाहते तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहात होते. हा तिसरा सिझन ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिझनमध्ये रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी, अली फजल, पंकज त्रिपाठी, जीतेंद्र कुमार हे कालाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या कलाकारांनी वेब सीरिजसाठी किती मानधन घेतले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: मनी लाँड्रींग प्रकरणात निया शर्मा, करण वाही आणि क्रिस्टल डिसूझाची चौकशी
मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये कॉलिन भैय्या हे खूपच गाजले आहेत. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी हे पात्र साकारले आहे. त्यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. मिर्झापूर या सीरिजसाठी पंकज त्रिपाठी यांना सर्वाधिक मानधन देण्यात आले आहे. त्यांनी जवळपास १५ कोटी रुपये फी घेतली आहे.
पंचायत वेब सीरिजमधील सचिवजींची मिर्झापूरमध्ये खास एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सचिवजींची भूमिका साकारणाऱ्या जीतेंद्र कुमारने मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनसाठी जवळपास ४ ते ५ लाख रुपये मानधन घेतले आहे.
वाचा: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची ५० लाख रुपयांची फसवणूक? काय झालं नेमकं वाचा
श्वेता त्रिपाठीने आजवर प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने मिर्झापूर वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनसाठी प्रत्येक एपिसोडसाठी २.२० लाख रुपये मानधन घेतले होते. आता तिसऱ्याच्या एका एपिसोडसाठी तिने ४ लाख रुपये घेतले आहेत.
अभिनेता अली फजल मिर्झापूर या सीरिजमध्ये अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याने एका एपिसोडसाठी १२ लाख रुपये घेतले होते. आता तिसऱ्या सिझनसाठी त्याने १५ लाख रुपये घेतले आहेत.
वाचा: नीना गुप्ता-व्हीव रिचर्ड्स यांची पहिली भेट कुठे झाली? वाचा लव्हस्टोरी
समोर आलेल्या माहितीनुसार, मिर्झापूर या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनसाठी रसिका दुग्गलने एका एपिसोडसाठी २ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर या आत तिसऱ्या सिझनसाठी तिने एका एपिसोडचे ५ लाख रुपये घेतले आहेत.
संबंधित बातम्या