बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पुष्पा २ : द रूल' हा सिनेमे ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाच्या अडवान्स बुकींगने सर्वजण चकीत झाले होते. आता ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाला मागे टाकत नवा विक्रम केला आहे. चला जाणून घेऊया नेमकं किती कमाई केले?
Sacnilk.com दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १० वाजता या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये प्रदर्शन झाले. पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास १६० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी राम चरण, ज्युनिअर एनटीआर यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाने पहिल्या दिवशी १३३ कोटींची कमाई केली होती. पुष्पा २ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या सर्वाधिक कमाईमध्ये तेलुगू भाषेचा ८०.१४ टक्के भाग आहे.
बुक माय शोचे सिनेमाचे सीओओ आशिष सक्सेना म्हणाले, 'पुष्पा २ : द रूल'ने अधिकृतपणे इतिहास रचला आहे. अडवान्स बुकींगमध्ये चित्रपटाने ३० लाख रुपयांची कमाई केली होती. पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केल्याने सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. पुष्पा २ : द रूल साठी हा केवळ विक्रमी मैलाचा दगड नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अविस्मरणीय क्षण आहे.
भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी ओपनिंग आरआरआर सिनेमाने केली होती. या चित्रपटाने एकूण कमाई २२३ कोटी रुपयांची केली होती. त्यानंतर बाहुबली सिनेमाने २१७ कोटी रुपयांची कमाई केली आणि कल्की एडी सिनेमाने १७५ कोटी रुपये कमावले होते. आता पुष्पा २ ने या सर्व सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चित्रपटाने २५० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे.
वाचा: रवींद्र महाजनींच्या पत्नीच्या मदतीला धावून आले होते बाळासाहेब ठाकरे, वाचा नेमकं काय झालं होतं?
सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेकावत यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला पहिल्या भागातील अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. चित्रपटात लाल चंदन तस्करीच्या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्ष दाखवण्यात आला होता.
संबंधित बातम्या