Allu Arjun Pushpa 2 Fees: साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा: द राइज' अर्थात 'पुष्पा १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला होता. अल्लू अर्जुन याने या चित्रपटात इतकी धमाकेदार अभिनय केला की, सगळेच त्याचे चाहते झाले. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसचं नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावर देखील गारुड केलं. 'पुष्पा' या चित्रपटातील संवाद, गाणी आणि अभिनय सगळंच खूप गाजलं. आता या चित्रपटाचा सिक्वेल अर्थात 'पुष्पा २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दरम्यान 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुन याने किती मानधन घेतले, याची माहिती समोर आली आहे.
'पुष्पा १' हा चित्रपट तुफान गाजल्यानंतर अल्लू अर्जुनने आपले मानधन वाढले असल्याच्या खूप चर्चा झाल्या होत्या. यानंतर आता 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने मोठी रक्कम आकारली असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्स नुसार अल्लू अर्जुन याने या चित्रपटासाठी एक रुपयाही मानधन आकारले नसल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने 'पुष्पा २'साठी कोणतीही फी घेतली नाही. अल्लू अर्जुन या चित्रपटात मोफत काम करणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अल्लू अर्जुन कोट्यवधींची कमाई करणार आहे.
अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी मानधन घेण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. या ऐवजी चित्रपटाच्या एकूण कमाईत ३३% वाटा त्याचा असणार आहे. 'पुष्पा २' हा चित्रपट जी काही कमाई करेल, यात ओटीटी हक्क, उपग्रह हक्क आणि थिएटर हक्क मिळून जी कमाई होईल, त्यातील ३३% हिस्सा हा अल्लू अर्जुनचा असणार आहे. मात्र, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अल्लू अर्जुनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा २'चे ओटीटी हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतले असल्याचे म्हटले जात आहेत. 'पुष्पा २'ची ओटीटी डील ९० कोटींमध्ये झाली आहे. 'पुष्पा २' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.