मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अल्लू अर्जुन बॉडी शेमिंगचा शिकार, नेटकऱ्यांनी पातळी सोडत केल्या गलिच्छ कमेंट
अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन
27 June 2022, 12:34 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 12:34 IST
  • (allu arjun )अल्लू अर्जुनचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. याच फोटोंमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

आपल्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावणारा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (allu arjun) सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. 'पुष्पा' या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याच्या हटके अंदाजाने प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या डान्स स्टाईलने देखील त्याने प्रेक्षकांना वेड लावलं. परंतु, आता मात्र नेटकरी त्याच्यावर वाईट कमेंट करत आहेत. नॅशनल क्रेज असणारा हा अभिनेता आता नेटकऱ्यांच्या बॉडी शेमिंगचा (body shame)शिकार ठरला आहे. नेटकरी त्याच्यावर अगदी तुटून पडले आहेत. याचं कारण आहे त्याचं वाढलेलं वजन. अल्लू अर्जुनचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. याच फोटोंमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकताच अल्लू अर्जुनला एका कॅफेमध्ये पाहिलं गेलं. तिथून बाहेर पडतानाचे त्याचे फोटो नेटकऱ्यांमध्ये वायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये त्याने निळ्या रंगाचं टी शर्ट आणि ट्राउझर परिधान केली आहे. आपल्या अभिनेत्याला पाहून काही नेटकर्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला मात्र काही नेटकर्यांनी त्याच्या वजनावरून अनेक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. फोटोंमध्ये त्याचं वजन वाढलेलं दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन त्याला ट्रोल केलं आहे. कुणी त्याला म्हातारा म्हटलं तर कुणी त्याला वडापावची उपमा दिलीये. एकाने कमेंट करत लिहिलं, 'हा तर सडकछाप चोरासारखा दिसतोय आणि या भिकाऱ्यावर लोक इतकं प्रेम करतात.' आणखी एका युझरने त्याला 'मोटा भाई' म्हटलं.

अल्लू अर्जुनचं वाढलेलं वजन पाहून इतर नेटकरीही अवाक झाले आहेत. आता त्याने 'पुष्पा २' साठी वजन वाढवलं असल्याचं म्हटलं जातंय. पण हे कितपत खरं आहे हे येत्या काळातच कळेल.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग