दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा २ : द रूल' हा चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतातील निवडक प्रदेशांमध्ये, विशेषत: हिंदी भाषिक पट्ट्यात चित्रपटाचे अडवान्स बुकिंग सुरु आहे. काही शहरांमध्ये तर या चित्रपटाच्या तिकिटांची किंमत जवळपास २००० रुपयांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि निर्माते एका कार्यक्रमाला पोहोचले होते. या कार्यक्रमात एका चाहत्याने तिकिटांच्या किंमतीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निर्मात्यांना 'हे दर योग्य आहेत का?' असा प्रश्न विचारला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हैदराबादमधील एका कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमाला कलाकार आणि निर्माते दोन्हीही उपस्थित होते. एक चाहता पुष्पा २ : द रूल इन तेलुगू चित्रपटाच्या निर्मात्याला प्रश्न विचारताना दिसला: "सर, आमच्याकडून तिकिटासाठी १२०० रुपये जास्त आकारले जात नाहीत का?" ते पाहून निर्माते देखील आश्चर्याने या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना दिसले.
पुष्पा २ : द रूल दिल्लीच्या पीव्हीआर डायरेक्टर्स कटच्या तिकिटांचे दर मल्टिप्लेक्समध्ये प्रीमियम आहेत. दिल्लीच्या पीव्हीआर डायरेक्टर्स कटमधील हिंदी टू डी व्हर्जनच्या तिकिटांची किंमत २४०० रुपये आहे. मुंबईत मायसन पीव्हीआर : जिओ वर्ल्ड ड्राइव्हचे तिकीट दर २१०० रुपये आहे. मुंबईतील अनेक चित्रपटगृहांमध्ये अशाच आसनांची किंमत १५०० ते १७०० रुपयांच्या दरम्यान आहे. आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटाने आतापर्यंत तेलुगूमध्ये १२ कोटी आणि हिंदीमध्ये ८ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
कार्यक्रमात आरआरआरचे दिग्दर्शक एसएस राजामौली देखील उपस्थित होते. सिक्वेलमधील पुष्पा राजच्या इंट्रोडक्शन सीनबद्दल त्याने एक स्टोरी शेअर केली. "काळजी करू नका, सुकू (सुकुमार), मी सीनबद्दल बोलणार नाही, मी फक्त तो किती चांगला होता याबद्दल बोलेन. जर पहिला सीन इतका प्रभावी असेल तर हा चित्रपट किती चांगला आहे याची कल्पना करा" असे ते म्हणाले.
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?
काय असणार कथा?
सुकुमारच्या पुष्पा २ : द रूल या चित्रपटात अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा राजच्या आयुष्याचा वेध घेतला जात आहे. या सिक्वलमध्ये रश्मिकाने साकारलेल्या श्रीवल्लीसोबतचे त्याचे लग्न आणि फहादने साकारलेल्या भंवर सिंग शेकावतशी असलेले त्याचे वैर अधिक उलगडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या