Allu Arjun Anniversary Emotional Post: मनोरंजन विश्वाचा लाडका ‘पुष्पा’ अर्थात अभिनेता अल्लू अर्जुन याच्या लग्नाचा आज (६ मार्च) १३वा वाढदिवस आहे. याच खास दिवसाचं निमित्त साधून अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. लग्नाच्या १३ वर्षानंतर देखील अल्लू अर्जुन पत्नी स्नेहा रेड्डी हिच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसत आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पत्नी स्नेहा रेड्डीसोबतचा एक फोटो शेअर करत तिला क्यूटी म्हटले आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॅप्पी ॲनिव्हर्सरी क्यूटी. आज १३ वर्षे झाली आहेत. तुझ्या सहवासामुळे माझी भरभराट झाली आहे. तुझ्या शांततेतून मला ऊर्जा मिळते. आयुष्याच्या शेवटापर्यंत... अजून खूप काही बाकी आहे.’
अल्लू अर्जुन हा इंडस्ट्रीतील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. पण, त्यासोबतच तो एक कौटुंबिक माणूस आहे. अल्लू अर्जुन नेहमीच कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो. अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांना साऊथ इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हटले जाते. एका जवळच्या मित्राच्या लग्नात अल्लू अर्जुन आणि स्नेहा यांची पहिली भेट झाली होती. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आज अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांना अल्लू अयान आणि अल्लू अर्हा अशी दोन गोंडस मुलं आहेत. दोघेही पालक म्हणून आपली जबाबदारी निभावताना दिसतात. स्नेहा आणि अल्लू अर्जुन नेहमीच सगळ्यांना ‘कपल गोल्स’ देत असतात. साऊथ मनोरंजन विश्वातील ही जोडी प्रेक्षकांची अतिशय लाडकी आहे.
सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या सोबत त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा २’च्या रिलीजसाठीची जोरदार तयारी करत आहे. सध्या अल्लू अर्जुन चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग करत आहे. त्याचे चाहते आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर त्याला ‘पुष्पा’च्या अवतारात पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनने पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. अल्लू अर्जुन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा पहिला अभिनेता बनला आहे.
संबंधित बातम्या