साडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा २’चा टीझर बघाच...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा २’चा टीझर बघाच...

साडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा २’चा टीझर बघाच...

Apr 08, 2024 11:28 AM IST

अल्लू अर्जुनचा आगामी ब्लॉकबस्टर चित्रपट'पुष्पा २' चा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या टीझरची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

साडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा २’चा टीझर बघाच...
साडी, कानात झुमके अन् हातात त्रिशूळ; अल्लू अर्जुन झालाय टोटल फायर! ‘पुष्पा २’चा टीझर बघाच...

प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आज (८ एप्रिल) त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू अर्जुन यांचा जन्म ८ एप्रिल १९८२ रोजी चेन्नई येथे झाला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक धमाकेदार सरप्राईज मिळालं आहे. अल्लू अर्जुनचा आगामी ब्लॉकबस्टर चित्रपट'पुष्पा २' चा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या टीझरची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पुन्हा एकदा ‘पुष्पा २’ अर्थात ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत ‘श्रीवल्ली’ रश्मिका मंदाना ही जोडी पाहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये काय खास आहे, ते बघाच...

'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांच्या भूमिकांचे पोस्टर्स आधीच रिलीज करण्यात आले होते. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हेच लक्षात घेऊन आता'पुष्पा'च्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त ‘पुष्पा २’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच आज या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटात काहीतरी खास घडणार आहे. चित्रपटाची अर्धी कथा त्याच्या टीझरवरूनच लक्षात आली आहे. या टीझरने सगळ्यांचीच आतुरता वाढवली आहे.

१.०८ मिनिटाच्या या टीझर व्हिडीओमध्ये एकही संवाद नाही. मात्र, एक जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळाला आहे.  या टीझरने रिलीज होताच धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. 

‘पुष्पा २’ची जबरदस्त क्रेझ...

‘पुष्पा २’च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एका ॲक्शन सीक्वेन्समध्ये साडी अवतारात दिसला आहे. अल्लू अर्जुनचा हा लूक चित्रपटातील जत्रेच्या सीक्वेन्सचा एक भाग आही. जत्रा सीक्वेन्स हे या चित्रपटाचे खास आकर्षण असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपटातील सर्वात मोठा भाग असणार आहे. याआधी अल्लू अर्जुनचे पोस्टर रिलीज झाले होते. या पोस्टरवर तो साडीत दिसला होता.'पुष्पा: द राइज' चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. एका मुलाखतीत निर्मात्यांनी म्हटले होते की, हा चित्रपट साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या चित्रपटांच्या यादीत सामील होईल, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आता ‘पुष्पा २’ हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

Whats_app_banner