दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटा आगामी भाग 'पुष्पा २' १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपये कमावले असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी इतकी कमाई कशी केली? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
'पुष्पा २' या चित्रपटाविषयी अतिशय गोपनियता बाळगण्यात आली आहे. या चित्रपटाचे जवळपास ५०० कोटी रुपयांचे बजेट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा भव्यदिव्य चित्रपट प्रदर्शित होताच किती कमाई करतो याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेच आहे. पुष्पा या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असल्यामुळे पुष्पा २ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशातच चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच १६० कोटी रुपयांची कमाई केली असल्याचे समोर आले आहे. ही कमाई कशी केली चला जाणून घेऊया..
वाचा: गेल्या महिनाभरापासून जुई गडकरी आजाराने त्रस्त, तरीही करते शुटिंग; काय झालं नेमकं जाणून घ्या?
पुष्पा २ हा बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे ५०० कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाचे निर्मात्यांनी जगभरातील संगीताचे हक्क आणि हिंदी सॅटेलाइट हक्क टी-सीरीजला ६० कोटी रुपयांना विकले आहेत. तसेच 'स्टार मां' या वाहिनीने तेलुगू सॅटेलाइट राइट्सही विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. पण ही डील नेमकी किती रुपयांमध्ये बंद झाली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: ‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?
अनेकदा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्म विकत घेताना दिसतात. पण या सगळ्याला पुष्पा २ हा चित्रपट अपवाद ठरला आहे. पुष्पा २ या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला आताच विकण्यात आले आहेत. जवळपास १०० कोटी रुपयांना हे हक्क विकल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ओटीटी हक्क आणि संगीताचे हक्क मिळून चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच १६० कोटी रुपयांची कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाचा: 'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
संबंधित बातम्या