Pushpa 2: बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाची सर्वजण वाट पाहात आहेत. २०२४ या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाच्या २ मिनिटे ४८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि दमदार डायलॉग्सचा उत्तम मेळ आहे. लाल चंदनाची तस्करी करणारा पुष्पा मोठा माफिया झाला आहे. तो देशातीलच नाही तर जगभरातील खिलाडी म्हणून ओळखला जात आहे. चंदनाची तस्करी करण्यासोबतच त्याचे खासगी आयुष्यदेखील दाखवण्यात आले आहे. श्रीवल्लीवर असलेल्या प्रेमाखातर पुष्पा काय काय करतो हे देखील दाखवण्यात आले आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'पुष्पा २ : द रूल' या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर एकाने लिहिलं, '2000 कोटी कन्फर्म झाले.' तर दुसऱ्या एका यूजरने 'ट्रेलर पाहिल्यानंतर तोंडातून एकच गोष्ट बाहेर पडत आहे, झुकणार नाही' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, "आग नाही, जंगली आग है रे तू" असे म्हटले आहे.
'पुष्पा 2: द रूल' चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही डायलॉग हे प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत.
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांचा 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट 5 डिसेंबररोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती मिथरी मूव्ही मेकर्स आणि सुकुमार यांनी केली आहे. संगीत टी-सीरिजने दिले आहे. चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम, बांगला, कन्नड आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
वाचा: नागा चैतन्य शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पाहुण्यांना काय भेट दिली पाहा
'पुष्पा २ : द रूल' पाहण्याआधी 'पुष्पा : द राईज' पाहणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 'पुष्पा : द राइज' पाहिला नसेल तर ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.