Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढणार! आता अभिनेत्यावर पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढणार! आता अभिनेत्यावर पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढणार! आता अभिनेत्यावर पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Dec 24, 2024 12:07 PM IST

Allu Arjun Tension Increased : अल्लू अर्जुनविरोधात नवी तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रपटात पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने त्याच्यावर केला आहे.

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन

Allu Arjun Insulted Police : ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अल्लू अर्जुनला जेवढे यश मिळाले आहे, तेवढाच तो वादातही अडकत आहे. आता या अभिनेत्याविरोधात नवी तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते तिनमार मल्लना यांनी ‘पुष्पा २ : द रूल’ या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनने पोलिसांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटातील एका सीनमध्ये स्विमिंग पूलमध्ये एक पोलीस अधिकारी स्वीमिंग करताना दिसत आहे, तर त्याच स्विमिंग पूलमध्ये अल्लूची व्यक्तिरेखा पुष्पा राज लघवी करताना दाखवला आहे. या दृश्यावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

तिनमार मल्लना यांनी हे दृश्य 'अपमानजनक' असल्याचे म्हटले असून, हा कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा मोठा अपमान असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय या अभिनेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आधीच अभिनेता अडकलाय वादात!

हैदराबादच्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अल्लू आधीच वादात अडकला आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती आणि यामुळे त्याला एक रात्र तुरुंगात राहावे लागले होते. नुकतेच अपडेट आले की, त्या महिलेसोबत चेंगराचेंगरीत जखमी झालेला मुलगाही आता गंभीर आहे.

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर फेकले टोमॅटो, केली तोडफोड! उस्मानिया विद्यापीठाच्या आठ विद्यार्थ्यांना अटक

याआधी रविवारी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर काही लोकांनी निदर्शने केली होती. तसेच, त्याच्या घराबाहेर तोडफोड केली होती. या प्रकरणी पोलिसांनी ८ आंदोलकांना ताब्यात घेतले होते. चांगली गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार घडला, तेव्हा अभिनेता घरी उपस्थित नव्हता.

पोलीस अधिकारी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार!

अभिनेत्याच्या अंतरिम जामिनाविरोधात पोलिस अधिकारी आता न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा दावा आहे की अल्लू अर्जुनला  ४ डिसेंबर रोजी थिएटर सोडण्यास सांगण्यात आले होते, परंतु तो बाहेर गेला नाही, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. पोलिस म्हणतात की, अभिनेत्याच्या मॅनेजरला महिलेच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आले होते आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे देखील सांगितले गेले होते. परंतु, अभिनेत्याच्या टीमच्या सदस्यांनी अल्लूला हा संदेश दिलाच नाही.

चित्रपटाने केली तगडी कमाई! 

सध्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, आता तिसऱ्या आठवड्यापर्यंतही चित्रपटाचे कलेक्शन खूप चांगले झाले आहे. ‘पुष्पा २’ने जगभरात १६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Whats_app_banner