मराठी टेलिव्हिजनवर ‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी कार्यक्रमानंतर आता ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे तीन विनोदाचे हुकमी एक्के एकत्र काम करणार असून महाराष्ट्रातील जनतेला हसवण्यास सज्ज झाले आहेत. आता या कार्यक्रमाचा चित्रीकरणास सुरुवात झाली असून पहिल्या भागाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी सोशल मीडियावर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. हा फोटोपाहून कार्यक्रमाच्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अलका कुबल पाहुण्या म्हणून येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच त्या परिक्षक म्हणून दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
वाचा: गेल्या महिनाभरापासून जुई गडकरी आजाराने त्रस्त, तरीही करते शुटिंग; काय झालं नेमकं जाणून घ्या?
‘हसताय ना ?हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि अलका कुबल हे कलाकार परिक्षक म्हणून दिसणार आहेत. ते कार्यक्रमातील कलाकारांची दाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अलका कुबल यांनी सोशल मीडियावर सेटवरचा फोटो शेअर केला आहे.
वाचा: ‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?
अलका कुबल यांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोत अलका कुबल यांच्यासह भरत जाधव व निलेश साबळे पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या फोटोत अलका या एका खुर्चीत बसलेल्या दिसत आहेत. हे फोटो शेअर करत अलका यांनी, “‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ लवकरच फक्त ‘कलर्स मराठी’वर” असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: 'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
'हसताय ना? हसायलाच पाहिजे' हा कार्यक्रम नेमका काय आहे? हे याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, दिग्दर्शन आणि लेखन हे निलेश साबळेने केले आहे. तसेच भाऊ कदम, ओंकार भोजने, सुपर्णा श्याम, रोहित चव्हाण आणि स्नेहल शिदम हे कलाकार या कार्यक्रमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता पाहायला मिळते आहे. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता प्रदर्शित होणार आहे. २० एप्रिल पासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
संबंधित बातम्या