मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Alka Kubal: 'आलंय माझ्या राशीला'मध्ये अल्का कुबल-चिन्मय मांडलेकर दिसणार एकत्र, टीझर प्रदर्शित

Alka Kubal: 'आलंय माझ्या राशीला'मध्ये अल्का कुबल-चिन्मय मांडलेकर दिसणार एकत्र, टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 16, 2023 02:19 PM IST

Aalay Mazya Rashila Teaser: 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटात मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर‌, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड ही मोठी स्टार कास्ट दिसणार आहे.

आलंय माझ्या राशीला
आलंय माझ्या राशीला (HT)

मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरचा 'गांधी गोडसे- एक युद्ध' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अशातच आता चिन्मय मांडलेकरचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहे.

चिन्मय मांडलेकर हा 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती, त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. चित्रपटात नेमकं काय असणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल.
वाचा: भर रस्त्यात राखी सावंतला अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं काय झालं?

प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्ट्ये, सौंदर्य आहेत. या वैशिष्ट्यांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा चित्रपट म्हणजे ‘आलंय माझ्या राशीला.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केले आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत.

अभिनेते चिन्मय मांडलेकर सोबत अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर‌, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड यांच्या या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. युवा अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून आपलं मनोरंजन क्षेत्रातील पदार्पण करताना दिसून येईल. एवढी मोठी स्टारकास्ट पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळतेय. हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग