New Marathi Movie: गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टी वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिका विश्वात धुमाकूळ सुरु असताना रुपेरी पडद्यावरही अनेक नवे चित्रपट येत आहेत. यामधील 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चर्चा सुरु होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ चित्रपटाच्या २ मिनिटे ५२ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एक वेगळीच कथा पहायला मिळत आहे. ‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असे हल्ली म्हटले जाते आणि याचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांनी साकारलेल्या भूमिकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. मात्र अचानक त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतोय. आता हा ‘चोर’ कोण असणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.
वाचा: आलिया भट्टचा पहिला सिनेमा माहिती आहे का?
'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटात तगडी स्टार कास्ट आहे. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा चित्रपट २९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहाता त्यामधील स्टार कास्ट आणि कथा यावरून हा चित्रपट म्हणजे एक मनोरंजनाचा परिपूर्ण बॉक्स असणार हे नक्की!
वाचा: अभिनेता नाही तर पत्रकार असता अभय देओल, या चित्रपटाने बदलले आयुष्य
'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे. तर विवेक बेळे यांनी लेखन केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे निर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''चाळीशी हा आयुष्याच्या असा टप्पा आहे जेंव्हा आलेल्या स्थैर्यामुळे जगण्यात एक विचित्र एकसुरीपणा येतो. आणि मग सुरू होतो 'एक्साईटमेंट' शोधण्याचा खेळ! आणि मग जी धमाल घडते आणि असलेल्या नात्यांचीच पुन्हा नव्याने ओळख होते हे मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक मनमुराद हसतीलही आणि कधी भावनिकही होतील. हा चित्रपट जरी चाळिशी उलटून गेलेल्या चोरांचा आहे तसाच चाळिशीत येऊ घातलेल्या चोरांसाठीही आहे."
संबंधित बातम्या