"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" चित्रपट झाला लीक, निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" चित्रपट झाला लीक, निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार

"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" चित्रपट झाला लीक, निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 05, 2024 08:41 AM IST

"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" हा चित्रपट लीक झाला आहे. याबाबत निर्मात्यांना कळताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.

"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" चित्रपट झाला लीक,  निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार
"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" चित्रपट झाला लीक, निर्मात्यांनी केली पोलिसात तक्रार

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. आता एक नवा कोरा आणि मजेशीर चित्रपट "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या नावावरुन चित्रपटात मजेशीर कथा पाहायला मिळत असल्याचे म्हटले जात होते. हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला पायरसिचा झटका बसल्याचे दिसत आहे.

"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" हा चित्रपट २९ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर हा चित्रपट आता लिक झाल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाची कॉपी व्हॉट्सअॅपवर फॉर्वर्ड होत आहे. याबाबत चित्रपट निर्मात्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. "मृद्गंध कंपनीची निर्मिती असणारा अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाची कॉपी व्हॉट्सअॅपवर कोणत्याही परवानगी शिवाय पाठवली जात आहे. हे कायद्याच्या विरोध आहे. या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी" असे तक्रारीमध्ये म्हटले गेले आहे. सोबतच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या चित्रपटाचे स्क्रीनशॉट जोडण्यात आले आहेत.
वाचा: २० वर्षांत बायकोला किती पैठण्या दिल्या?; आदेश बांदेकर यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

कोणते कलाकार आहेत?

"अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळेने केले असून चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे, आनंद इंगळे, अतुल परचुरे आणि मधुरा वेलणकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.
वाचा: मी जास्तीत जास्त २ हजार रुपये खर्च करते; कपड्यांवर वायफळ खर्च करण्यावर मृणाल ठाकूरची प्रतिक्रिया

काय आहे चित्रपटाची कथा

अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' या चित्रपटाच्या नावावरुनच आपल्याला कळत आहे की, हा चित्रपट 'चाळीशी' भोवती फिरणाऱ्या मित्रांची कथा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेले आहे. एका पार्टीत मजामस्ती करत असताना अचानक अशी काही घटना घडते की चाळीशीतल्या मित्रांची धांदल उडते. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन अशी मजेशीर कथा चित्रपटात पाहायला मिळत आहे.

Whats_app_banner